घरपालघरतालुक्यात महाशिवरात्रीसाठी शिवमंदिरे सज्ज

तालुक्यात महाशिवरात्रीसाठी शिवमंदिरे सज्ज

Subscribe

भाविकांसाठी खास आकर्षण असते. अंदाजे दोन ते दहा किलो वजनाचे हजारोंच्या संख्येने असलेले हे मासे पावसाळ्यातील नदीच्या महापुरातही आपली जागा सोडत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जाते.

वाडा: दि .७ महाशिवरात्रीसाठी वाडा तालुक्यातील तिळसेश्वर, नागनाथ, घोडमाळ, कोंढले, नारे कुडूस व निंबवली या ठिकाणची शिवमंदिरे सज्ज झाली असून या मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक रोषणाही करण्यात आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडा तालुक्यातील तिळसेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त होत असलेल्या या यात्रेसाठी लाखो शिवभक्तांनी गर्दी उसळत असते.वाडा येथून दहा किलोमीटर अंतरावर तिळसेश्वर येथे पांडवकालीन शिवमंदिर आहे. हे मंदिर वैतरणा नदी पात्राच्या मधोमध असलेल्या उंच टेकडीवर बांधलेले आहे. या मंदिराच्या लगतच वाहत असलेल्या नदीच्या पाण्यामध्ये एकाच जागी हजारोंच्या संख्येने फिरत असलेले देवमासे पहाणे हे भाविकांसाठी खास आकर्षण असते. अंदाजे दोन ते दहा किलो वजनाचे हजारोंच्या संख्येने असलेले हे मासे पावसाळ्यातील नदीच्या महापुरातही आपली जागा सोडत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जाते.

येथील यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाडा बस आगाराकडून तिनशे ते चारशेहून अधिक बसफेर्‍ यांची सुविधा उपलब्ध केली जाते. येथील धार्मिक स्थळांचे पावित्र्य लक्षात घेऊन व येणार्‍या पर्यटकांची गर्दी पाहता शासनाने या स्थळाला पर्यटनाचा दर्जा दिला आहे. तर वैतरणा नदीच्या काठावर आंबिस्ते येथे नागनाथाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. घोडमाळ, नारे, कोंढले,कुडूस येथेही शिव शंकराचे मंदिर असून येथे मोठी जत्रा भरते.शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. ही मंदिरे शिवरात्रीसाठी सज्ज झाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -