घरपालघरवसईकर जलतरणपट्टूंचा जागतिक विक्रम

वसईकर जलतरणपट्टूंचा जागतिक विक्रम

Subscribe

विशेष म्हणजे त्यांनी अगदी कमी दिवसात हा विक्रम केला आहे. सहाही जलतरणपटूंनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा व मोहीमांमध्ये अनेक लांब अंतरावरील खुल्या पाण्यात पोहण्याचेही विक्रम केले आहेत.

वसई : वसईतील सहा तरुण जलतरणपट्टूंनी गेट वे ते गोवा आणि गोवा ते वसई असा सागरी १ हजार १०५ किलोमीटर पोहण्याचा जागतिक विक्रम केला. याआधीचा विक्रम परदेशी जलतरणपट्टूंनी केला होता. पण, ते सर्वजण ३५ वर्षे वयोगटातील होते. तर नवा विक्रम रचणारे वसईकर जलतरणपट्टू हे अवघ्या पंचवीसीतील आहेत.
कार्तिक संजय गुगले (२०),राकेश रवींद्र कदम ( २४ ),संपन रमेश शेलार (२१),जिया राय (१४ ),दुर्वेन विजय नाईक (१७),राज संतोष पाटील (१७) अशी विक्रमवीर जलतरणपट्टूंची नावे आहेत. या सहा जलतरणपटूंनी गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) ते डोना पॉला (गोवा) आणि परत वसई किल्ल्यापर्यंत रिले पद्धतीने पोहून एकूण 1105 किमी आणि 450 मीटर अंतर 11 दिवस 22 तास आणि 13 मिनिटे 4 सेकदांनी पूर्ण केले. या मोहिमेत मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथून दि. 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी सुरुवात झाली होती. आणि गुरुवार दि. 29 डिसेंबरला दुपारी 1.45 मिनिटांनी त्याचा समारोप झाला. आतापर्यंत विश्वातला कॅलिफोर्निया येथील 2019 मध्ये 959 किमी पोहण्याचा विक्रम मोडीस वसईकरांनी मोडीत काढला आहे. यापूर्वी माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, यूएसए येथे 2019 मध्ये 959 किमी पोहण्याचा जागतिक विक्रम करण्यात आला होता. मात्र त्या विक्रमात वयोगट हा 35 वर्षे होता. मात्र, नवा विक्रम प्रस्थापित करणारे वसईतील सहाही जण 25 वर्षाच्या खालच्या वयोगटात मोडत आहेत. हे विशेष आहे. विशेष म्हणजे त्यांनी अगदी कमी दिवसात हा विक्रम केला आहे. सहाही जलतरणपटूंनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा व मोहीमांमध्ये अनेक लांब अंतरावरील खुल्या पाण्यात पोहण्याचेही विक्रम केले आहेत.

आमदार क्षितिज ठाकूर,माजी महापौर नारायण मानकर ,कला क्रीडा महोत्सवाचे प्रकाश वनमाळी, वसई तालुका शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे राजाराम बाबर, शहर प्रमुख संजय गुरव ,शशीभूषण शर्मा, वसई पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे , संदीप पंडित यांनी विक्रमविरांचे स्वागत केले. ऑल इंडिया पेरा स्विमिंग असोसिएशनचे सुबोध सुळे आणि ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनचे सुनील पाटील हे मोहिमेत निरीक्षक म्हणून सोबत होते. मोहिम पूर्ण करून जागतिक विक्रम केल्याबद्दल खेलो इंडिया खेलोचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा आमदार क्षितिज ठाकूर यांनी सहा जलतरणपटूंचे कौतुक केले आहे. सध्या सुरु असलेल्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात विक्रमविरांचा सन्मान करण्यात आला. या मोहिमेसाठी २०२१ पासून आम्ही तयारी करत होतो. गुरुवारी ही मोहीम पूर्णत्वास गेली असून त्याचा आनंद आणि सर्वस्वी अभिमान असल्याच्या भावना राजाराम बाबर यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -