घरफोटोगॅलरीPhoto : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचा ग्लॅमरस तडका

Photo : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचा ग्लॅमरस तडका

Subscribe

बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा 7 फेब्रुवारी विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, अशातच दिल्लीत त्यांच्या कुटुंबियांसोबत छोटेसे रिसेप्शन आयोजित केल्यानंतर, रविवारी मुंबईत देखील त्यांच्या बॉलिवूडमधील मित्रांसाठी मोठ्या धूमधडाक्यात एक भव्य रिसेप्शन आयोजित केले होते. रविवारी कियारा-सिद्धार्थच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात अभिनेत्री आलिया भट्ट, नीतू कपूर, अभिषेक बच्चन, विद्या बालन आणि तिचा पती, अजय देवगण, काजोल, रणवीर सिंह, वरुण धवन, दिशा पटानी यांसारखे अनेक कलाकार हजर होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -