२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या थरारक आठवणींना १३ वर्षे पूर्ण

Tourist visit Taj hotel and Gateway 13 years complete of 26 /11 terror attack which held 26 November 2008
या हल्ल्याच्या जखमा आजही ताज हॉटेल परिसरात गेल्यावर जाणवतात.

२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस मुंबई एकूण देशासाठी काळा दिवस ठरला. मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करत १० दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी भ्याड हल्ला घडवून आणला. या घटनेने मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या थरकाप उडवूण देणाऱ्या हल्ल्याला आज १३ वर्षे पूर्ण झाली. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉलेटबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १६० हून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला. तर मुंबई पोलीस दलातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनाही वीरमरणं आलं. २६/ ११ मुंबई हल्ल्याला इतकी वर्षे उलटून गेली तरी या हल्ल्यातील थरारक, वेदनादायी आणि कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत. (फोटो- दिपक साळवी)