घरराजकारणविकासाची मेट्रो तुफान वेगाने धावणार असल्याचे सांगत चित्रा वाघ यांचा मविआला टोला

विकासाची मेट्रो तुफान वेगाने धावणार असल्याचे सांगत चित्रा वाघ यांचा मविआला टोला

Subscribe

मुंबई : सध्या भाजपा तसेच शिंदे गटाच्या निशाण्यावर महाविकास आघाडी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मुंबई मेट्रो 3 मार्गावरील पहिली चाचणी पार पडली. सारीपूतनगर ते मरोळ नाका येथील ट्रॅकवर ट्रायल रन घेण्यात आली. त्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना विकासाची मेट्रो आता तुफान वेगाने धावणार असल्याचे सांगितले.

मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई मेट्रो 3च्या चाचणीला आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मेट्रो प्रकल्पामुळे राजकीय प्रदूषणसुद्धा बंद झाल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकावर केली. सरकारी काम सहा महिने थांब असे काहीही आम्हाला करायचे नाही. आम्हाला कमी वेळेत जास्त काम करायचे आहे. आम्हाला पूर्ण बॅटिंग करण्यासाठी फक्त अडीच वर्षच आहेत. त्यामुळे कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

तर, मेट्रो 3 ही मुंबईची लाइफलाइन आहे. कोणीही थांबवू शकत नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी कोणते काम केले असेल, तर ते म्हणजे या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये काहीही अडचणी राहिलेल्या नाहीत. काही आल्याच तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यात राजकारण झाल्याने या प्रकल्पाचा खर्चही वाढला, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही मेट्रोच्या कामावरून मागील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश… ढोंगी पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रोची वाताहात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकार संपुष्टाच आल्याने राज्याच्या विकासाची मेट्रो तुफान वेगाने धावणार, अशा आशयाचे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -