घरराजकारणईडीच्या तपासाला संजय राऊत हे सहकार्य करतील, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना विश्वास

ईडीच्या तपासाला संजय राऊत हे सहकार्य करतील, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना विश्वास

Subscribe

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर आहेत. गोरेगावच्या पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. याबाबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सावध भूमिका घेत, ‘देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार केंद्रीय तपास यंत्रणांना आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, त्यांच्या भगिनी व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत ईडीला सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी आज सकाळी सातच्या सुमारासच सीआरपीएफच्या फौजफाट्यासह ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक संजय राऊत यांच्या भांडुपस्थित मैत्री या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी शिवसैनिकांनी देखील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती आणि त्यांनी ईडीविरोधात घोषणाबाजी केली. तथापि, ईडीच्या चौकशीला संजय राऊत सहकार्य करतील आणि या तपासातून सत्य बाहेर येईलच, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सर्वसामान्य शिवसैनिक आज आनंदी, ईडी छाप्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

शिंदे गटातील काही आमदारांनी संजय राऊत यांच्या या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अशी प्रतिक्रिया दुर्दैवी आहे. राजकारणात विचारांचा विरोध केला जातो, त्यात एकमेकांवर वैयक्तिक टीका केली जात नाही. पक्ष म्हणून आम्ही कधीच कुणाबद्दल वैयक्तिक टिप्पणी करणार नाही. कुणीही आमचा वैयक्तिक विरोधक नाही, असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून ईडी पोहोचली संजय राऊत यांच्या दारी!

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -