घररायगडरोहात सहाय्यक गटविकास अधिकारी लाच घेताना अटक, विभागीय चौकशीचा अहवाल देण्यासाठी मागितली...

रोहात सहाय्यक गटविकास अधिकारी लाच घेताना अटक, विभागीय चौकशीचा अहवाल देण्यासाठी मागितली लाच

Subscribe

या घटनेमधील तक्रारदार यांची कोकण विभागीय कार्यालय कोकण भवन, नवी मुंबई मार्फत खातेनिहाय चौकशी सुरु होती. यासाठी आरोपी सहा. गटविकास अधिकारी राठोड यांची चौकशी अहवाल सादर करणारे अधिकारी म्हणून नेमणूक केली होती.

शासकीय कार्यालयांत मार्च अखेरची सर्व कामे आटोपण्याची धावपळ असतानाचा रोहे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. शुक्रवारी २५ मार्च रोजी पंचायत समिती कार्यालय सुरु होताच या अधिकार्‍याने आपल्या दैनंदिन कामकाजाची बोहनीच लाचेचे पैसे घेत केल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.पंडीत कौरु राठोड असे या अधिकार्‍याचे नाव आहे.

तक्रारदार यांची सुरु असलेल्या विभागीय चौकशीचा अहवाल त्यांच्या बाजूने पाठवण्यासाठी राठोड यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामधील पाच हजार रुपये आधी घेतले होते. उर्वरित दहा हजार रुपये स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना समोर येताच रोहे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समितीमधील भ्रष्ट कारभाराची चर्चा सर्वत्र होत आहे.

- Advertisement -

या घटनेमधील तक्रारदार यांची कोकण विभागीय कार्यालय कोकण भवन, नवी मुंबई मार्फत खातेनिहाय चौकशी सुरु होती. यासाठी आरोपी सहा. गटविकास अधिकारी राठोड यांची चौकशी अहवाल सादर करणारे अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. तक्रारदाराला सोयीस्कर अहवाल सादर करण्यासाठी राठोड यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामधील ५ हजार रुपये राठोड यांनी २८ फेब्रुवारीला स्वीकारले होते. त्यानंतर २४ मार्च २०२२ रोजी तक्रारदार यांनी लाच लुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत लाच लुचपत विभागाने सापळा लावला. त्यावेळी सहा. गटविकास अधिकारी राठोड यांनी उर्वरित दहा हजार रुपयांची मागणी करत ते पंच व साक्षीदारांच्या समक्ष स्विकारली. त्यानंतर लाचलुचपत विभागाचे अधिक्षक पंजाबराव उगले यांचे आदेशानुसार उप अधिक्षक सुषमा सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे यांचे नेतृत्वाखाली पो. ह. कौस्तुभ मगर, पो. ना. विवेक खंडागळे, जितेंद्र पाटील, म.पो. ना. स्वप्नाली पाटील यांच्या पथकाने सापळा रचत ही यशस्वी कारवाई केली.

रोहे पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीपासून मुख्य कार्यालयातील भ्रष्टाचाराचे अनेकानेक किस्से रोज कानावर येत असतात. रोहे तालुका म्हणजे सरकारी अधिकार्‍यांना नेहमी हवाहवासा वाटत आला आहे. तालुक्यात येणारा करोडो रुपयांचा निधी, औद्योगिक वसाहत, वाढते पर्यटन व त्यामुळे दिवसेंदिवस होणार्‍या विविध व्यवसायात वाढ आणि यासाठी लागणार्‍या परवानग्या व शासनाचे नियम यांचा आधार घेत अधिकारी आपले उखळ पांढरे करण्यात एकमेकांशी जणू स्पर्धा करत असल्याचे दिसत आहे. सर्वच विभागात अशा लाचखोर अधिकार्‍यांचा सुळसुळाट झाल्याचे पहायला मिळते.
फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -