घररायगडई स्कूटरस्वाराची माथेरानमध्ये घुसखोरी!; अश्वपालकांची तीव्र नाराजी

ई स्कूटरस्वाराची माथेरानमध्ये घुसखोरी!; अश्वपालकांची तीव्र नाराजी

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येथे गेल्या महिन्यापासून ई-रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट तीन महिन्यांसाठी सुरू असताना एका पर्यटकाने ई-स्कूटर फिरवल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचवल्या असून, अश्वपालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

माथेरान: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येथे गेल्या महिन्यापासून ई-रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट तीन महिन्यांसाठी सुरू असताना एका पर्यटकाने ई-स्कूटर फिरवल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचवल्या असून, अश्वपालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहन वगळता शहरात इंधनावर चालणार्‍या वाहनांसह इतर वाहनांना पूर्णपणे बंदी असून, काही वर्षांच्या संघर्षानंतर न्यायालयाने प्रायोगिक तत्वावर ई रिक्षा वापरण्यास परवानगी दिली आहे. ई रिक्षाला परवानगी असली तरी इतर ई वाहनांना मात्र अजिबात परवानगी नसताना बुधवारी पुणे येथील ६४ वर्षीय पर्यटकाने आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्याकरिता फिरण्यासाठी ई स्कूटरवरून प्रवास केला. सध्या सुरू असलेल्या ई रिक्षाच्या विरोधातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अचानक ई स्कूटर शहरात फिरल्याने अश्वपालकांमध्ये कमालीची चिंता वाढली आहे. यावेळी अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम, विकास रांजाणे, सचिन पाटील, इरफान शेख, पंकज सिंग इत्यादी उपस्थित पदाधिकार्‍यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. यानुसार संबधित पर्यटकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका या ठिकाणी कोणताही सूचना फलक नसल्याने किंवा या संदर्भात कोणीही माहिती दिली नसल्यामुळे अनवधानाने सदर प्रकार घडला असून, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत पर्यटकाने आपली बाजू मांडली.
दरम्यान, शहरात वाहन बंदी असताना शा कोणत्याही प्रकारचे वाहन भविष्यात शहरात येऊ नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रवेशद्वारावर सूचना फलक लावण्याची सूचना नगर पालिकेला केली असून, या प्रकरणात संबधित पर्यटकाने मायक्रो मोबिलिटी प्रकारातील ई स्कूटर शहरात फिरवल्याने वाहनबंदी कायद्याचे उल्लघंन केल्यामुळे त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -