घररायगडदसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातून दोन्ही गटाकडून ४० हजार शिवसैनिक जाणार  

दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातून दोन्ही गटाकडून ४० हजार शिवसैनिक जाणार  

Subscribe

कुणाचे कार्यकर्ते जास्त याचीच शर्यत

 

अलिबाग: मुंबईतील आजच्या दसरा मेळावासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने जिल्ह्यातून किमान तीस हजार तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने किमान पंधरा हजार शिवसैनिकांना देण्याचा दावा केला आहे. या दावे प्रति दाव्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार खलबत सुरु असून कुणाची गर्दी जास्त, कुणाचे कार्यकर्ते जास्त याचीच शर्यत लागल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवाजी पार्क येथे होणार्‍या दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून किमान दोन हजार शिवसैनिक जाणार आहेत, असे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर जैन यांनी सांगितले. मेळाव्याच्या तयारीसाठी पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक विधानसभा मतदार संघ स्तर,तालुका स्तर, विभाग स्तर आदींवर घेण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. मुख्यमंत्रीशिंदे यांच्याकडे तो विचार नाही. परिणामी बीकेसी मैदानावर होणार्‍या दसरा मेळाव्याचा काहीही उपयोग होणार नाही. शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य माणसे शिवसेनेबरोबर येण्यास तयार आहेत. ही पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे,असेही संपर्क प्रमुख जैन म्हणाले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. तेच शिवसैनिकांचे खरे भांडवल आहे. त्यामुळे सर्वपदाधिकारी आणि शिवसैनिकांनी अतिशय गांभीर्याने या विषयात काम करावे. शिवसैनिकांना मिळालेल्या या लढाईच्या संधीचे सोने करावे. हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी शिवतीर्थ येथे दसरा मेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी शिवसेना मुरूड तालुका प्रमुख नौशाद दळवी यांनी केले.

- Advertisement -

शिवाजी पार्कवर होणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी रायगड मधून पंधरा हजार शिवसैनिकांना मिळेल त्या वाहनाने पाठवण्याची नेते पदाधिकार्‍यांकडून तयारी केली जात आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी पदाधिकारी यांची बैठक पार पडली असून त्यात रायगड जिल्ह्यातून जवळपास पंधरा हजार शिवसैनिकांना मिळावा या नेणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. प्रत्येक विधानसभा प्रमुख तर शिवसेना आणि संघटना उद्दिष्ट देण्यात आले आहे.

दोन्ही गटांकडून तयारी
मेळाव्यासाठी जिल्ह्यातून शिंदे गट आणि शिवसेना पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून जोरदार तयारी करण्यात येत असून याबाबतची दोन्ही गटाची बैठक पार पडली आहे. त्यानुसार दोन्ही गटाकडून २५ हजाराहून अधिक लोक मेळाव्याला उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे. यासाठी त्या त्या तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी नियोजन केले असल्याचे पक्षांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातील जवळपास दोन्ही गटाकडून चाळीस एक हजारांहून अधिक शिवसैनिक यांचा ताफा मुंबईकडे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कूच करणार असल्याची माहिती दोन्ही गटांच्या पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. मेळावा असल्याने ट्रॅफिक जाम होण्यापूर्वी पोचण्याचा मानस आहे.

- Advertisement -

शिंदे गटाकडून ४२५ बसेस
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर खरी शिवसेना आपलेच असल्याचा दावा करणार्‍या शिंदे यांनी पक्षाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर ठेवला आहे. शिवाजी पार्कच्या तुलनेत बीकेसी मैदान हे दुप्पट क्षमतेचे असल्यामुळे शिंदे गटाने ताकद दाखवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. दोन आठवड्यापूर्वीच मंत्री दादा भुसे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन जास्तीत जास्त लोकांना नेण्याचे नियोजन केले आले. शिंदे गटाकडून रायगड जिल्ह्यात महेंद्र दळवी,भरत गोगावले तसेच जिल्हाप्रमुख राजा केणी,महिला जिल्हा संघटिकाशुभंगी करडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातून ३० हजार शिंदे समर्थक जाणार असून त्यांच्यासाठी ४२५ बसेस तसेच अन्य वाहने आणि जेवणाची सोय करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -