घररायगडमराठा समाज आरक्षणासाठी कर्जत बंदची हाक

मराठा समाज आरक्षणासाठी कर्जत बंदची हाक

Subscribe

पोलिस, तहसीलदार यांना निवेदन

कर्जत-: राज्य मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु आहे. तर आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आठ दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. जरांगे पाटील यांच्या पाठिंबा देत सरकारने आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा यासाठी कर्जत तालुका सकल मराठा (Sakal Maratha Samaj) समाजानेही शहरात साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र राज्य सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून उद्या शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी कर्जत बंदची (karjat Banda) हाक देण्यात आली आहे.

सकल मराठा समाज कर्जतच्यावतीने उद्या शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत संपूर्ण कर्जत, चार फाटा, दहीवली परिसर, कडाव, कशेळे, नेरळ, कळंब येथील सर्व बाजारपेठ बंद राहणार आहेत.शाळा, मेडिकल, हॉस्पिटल आणि बसे सेवा वगळून बाकी सर्व बंद असणार असल्याचे सकल मराठा समजाकडून सांगण्यात आले आहे. इतर व्यापार्‍यांनीही बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

मराठा समाज बांधवांचे आंदोलन व पुकारलेला बंद हा शांततामय मार्गाने होणार असल्याचे सांगत कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड, तहसीलदार शितल रसाळ यांना निवेदन देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -