घररायगडपोलिसांनी कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या; ४० ठिकाणी घरफोड्या

पोलिसांनी कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या; ४० ठिकाणी घरफोड्या

Subscribe

खोपोली शहरासह जिल्ह्यात आणि ठाणे, पुणे भागात ४० ठिकाणी घरफोड्या करणार्‍या कोयता गँगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून १ लाख २६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत केले आहेत. वरची खोपोली येथे गेल्या ३१ जानेवारी रोजी चार ठिकाणी घरफोड्या तसेच दहा ते पंधरा दिवसात सुमारे नऊ चोर्‍यांच्या घटना घडल्या होत्या.चोरट्यांकडे धारधार लांब कोयते असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आल्यामुळे कोयता गँगच्या अफवेमुळे शहरातील रहिवाशी भयभीत झाले होते. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली होती. अखेरीस पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खोपोली: शहरासह जिल्ह्यात आणि ठाणे, पुणे भागात ४० ठिकाणी घरफोड्या करणार्‍या कोयता गँगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून १ लाख २६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत केले आहेत. वरची खोपोली येथे गेल्या ३१ जानेवारी रोजी चार ठिकाणी घरफोड्या तसेच दहा ते पंधरा दिवसात सुमारे नऊ चोर्‍यांच्या घटना घडल्या होत्या.चोरट्यांकडे धारधार लांब कोयते असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आल्यामुळे कोयता गँगच्या अफवेमुळे शहरातील रहिवाशी भयभीत झाले होते. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली होती. अखेरीस पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी गुन्हे उघडकीस आणणे आणि मालमत्तेच्या गुन्ह्यांवर प्रतिबंध करण्याबाबत सुचना देवून आदेशित केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी खालापुर संजय शुक्ला यांचे सूचनेप्रमाणेपोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम तसेच पोलिसांचे विशेष पोलीस पथक तयार केले होते. या पथकाने कन्वरसिंग काळूसिंग टाक (३०, हडपसर, पुणे) यास बदलापूर एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून मुद्द्ेमाल हस्तगत केला आहे. त्याच्याविरोधी विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला असून अन्य दोघेजण त्याचे साथीदार असल्याचीे माहिती त्याने दिली. मात्र हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

चोरीतील ऐवज हस्तगत
गेल्या ३१ जानेवारी १ फेब्रुवारीस घडलेल्या चोरीच्या घटनांमधून चोरीस गेलेला १ लाख ३६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिन्यांपैकी १,२६,००० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. निहसलसिंग मनुसिंग सक(१८ हडपसर, पुणे), आणि सोनूसिंग भौड (१७ सिन्नरफाटा, नाशिक) हे दोघे फरार आहेत.येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी तसेच तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोसई अलोक खिसमराव, पोलीस नाईक प्रविण भालेराव आाणि पोलीस शिपाई प्रदिप खरात, सागर पडधान, संतोष भोये, दत्तात्रेय नुलके, स्वागत तांबे यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणून माल हस्तगत केला आहे.

- Advertisement -

कोयता गँगचा खोपोली शहरात हैदोस असल्याच्या खोटया आफवांमुळे नागरिक भयभीत झाले होते मत प्रत्यक्ष ते सराईत चोर आहेत.चोरट्यांनी चोरल्याला वस्तू चोरी झालेल्या नागरिकांना सन्मानपूर्वक देणार आहोत.
– शिरीष पवार
वरीष्ठ पोलिस निरिक्षक
खोपोली पोलिस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -