घररायगडमस्तच! मुंबई-सिंधुदुर्गं "ग्रीनफील्ड" रस्त्याने जोडणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मस्तच! मुंबई-सिंधुदुर्गं “ग्रीनफील्ड” रस्त्याने जोडणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Subscribe

राज्यातील जनतेला याला सुखी ठेव, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भराड़ी मातेला घातले.

नव्या कोकण महामार्गासंदर्भातली ही बातमी. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर कमी करण्यासाठी आता मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड रस्त्याने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणाचा पर्यटन दृष्ट्या विकास होण्यासाठी ही घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी येथे केली. आज ते आंगणेवाडी जत्रोत्सवात आई भराडीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

कोकणच्या विकासासाठी कोकण क्षेत्र विकास नियोजन प्राधिकरण ची निर्मिती करून या माध्यमातून कोकणचा विकास करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई ते सिंधुदुर्ग हा ग्रीनफील्ड रस्त्याने जोडला जाणार असल्याने येथील अपघातासह प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार. तर दुसरीकडे या ठीकाणी छोटी छोटी धरणे उभारण्याबरोबर राज्य खात्याची मदत घेवून उद्योग उभारण्याचा मानस असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून त्यांचा सत्कार ही करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोकणाचा सर्वांगीण पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत राज्यात काम करणारे शिंदे व फडणीस सरकार हे तुमचे सरकार आहे. त्यामुळे विकासासमोर ठेवून जागचे नियोजन सुरू आहे. या ठिकाणी गेली दोन वर्षे कोरोनासारखी महामारी आल्यामुळे विकास ठप्प झाला ही वस्तुस्थिती आहे. परंतु येणाऱ्या काळात या ठिकाणी छोटे मोठे उद्योग आणण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठया प्रमाणात पाऊस पडतो परंतु ते पाणी वाया जात आहे. त्यामुळे छोटी धरणे उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

आंगणेवाडी येथे भक्त निवास उभारण्यासाठी आणे कुटुंबीयांनी प्रस्ताव द्यावा त्यावर नक्कीच तात्काळ विचार केला जाईल असंही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, हे सरकार सामान्य जनतेचे आहे. या सरकारच्या भल्यासाठी आपण भराडी देवीला साकडे घातले असून हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी अंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर जगणे यांचा भगवी शाल आणि रोप देवून मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रात्री १२.३० वाजता जगणे कुटुंबियाकडून देवीची ओटी भरण्यात आली.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण भाजप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, भाजप आमदार नितेश राणे, भाजप माजी आमदार राजन संजय, प्रमोद जठार, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी उपस्थित होते.

मस्तच! मुंबई-सिंधुदुर्गं “ग्रीनफील्ड” रस्त्याने जोडणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -