घररायगडमुरुड आगार बंद होण्याच्या मार्गावर; रेवदंडा पूलाच्या कामामुळे अनेक गाड्या अलिबागमध्ये

मुरुड आगार बंद होण्याच्या मार्गावर; रेवदंडा पूलाच्या कामामुळे अनेक गाड्या अलिबागमध्ये

Subscribe

रेवदंडा पूलाच्या दुरुस्तीमुळे अलिबाग मुंबई, पुणे, ठाणे आणि इतर गाड्यांचा मार्ग बदलल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने काही प्रवाशांनी एसटी प्रवास टाळणे पसंत केले आहे. याचा परिणाम येथील एसटी आगाराच्या उत्पन्नावर झाला असून याची मोठी झळ बसू लागली आहे. त्यामुळे अनेक गाड्या अलिबाग आगाराकडे वळविण्यात आल्या आहेत. या घोळात मुरुड एसटी आगार संकटात आले असून बंद होण्याची शक्यता ाता वर्तवली जात आहे.

मुरुड:गणेश चोडणेकर

मुरुड-जंजिरा पर्यटन स्थळ असल्याने येथे येणारे पर्यटक एसटी ने ये-जा करीत असल्याने ही सेवा महत्त्वाची ठरते आहे. २००७ साली आगाराने तत्कालिन व्यवस्थापक पंकज ठोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पन्नाच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. मात्र आज हा आगार बंद होण्याच्या मार्गावर जात असल्याने दुर्दैवी चित्र आहे.
मुरुड आगाराकरिता साध्या गाड्या ३५ तर निमआराम १३ होत्या आणि चालक- वाहक असे एकूण १३३ कर्मचारी होते. मात्र आता पूलाच्या दुरुस्तीमुळे या आगारातून साध्या २३गाड्या, निम आराम १२ गाड्या अलिबाग आगाराकडे वळविण्यात आल्या. त्याबरोबर ५३ चालक, वाहकही तेथे पाठवण्यात आले. त्यामुळे सध्या या आगारात साध्या गाड्या २२ तर निम आराम १ असून अवघे ८० चालक, वाहक आहेत. गाड्यांच्या कमी संख्येमुळे वाहतुकीच्या फेर्‍याही कमी होऊ लागल्या, यामुळे प्रवासी खासगी वाहनांतून प्रवास करीत असल्याने एसटी बसकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट होते. याचा परिणाम आगाराला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने अव्वल ठरलेला हा आगार उत्पन्नाच्या बाबतीत मागे पडत आहे.

गाड्या पुन्हा मिळणार
रेवदंडा पूलाच्या दुरुस्तीमुळे मुरुड आगाराच्या गाड्यांसह चालक, वाहकही देण्यात आले आहे. पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर ज्या गाड्या आगाराकडून दिल्या गेल्यात त्या पुन्हा मिळणार आहेत. सध्या आगारातून मुंबई – साळाव मार्ग ६ तर भालगांव मार्ग २ आहेत,बोरिवली -भालगांव मार्ग १, कल्याण -साळाव मार्ग १,भांडुप – साळाव मार्ग १,स्वारगेट-साळाव-पाली मार्ग १, शिर्डी -साळाव मार्ग १, रोहा -भालगांव मार्ग ३ तर सुपेगाव १,महाड सुपेगाव मार्ग १तर साळाव मार्ग १,मुरुड – साळाव रोजच्या ५ फेर्‍या सुरु केल्या आहेत,अशी माहिती आगार व्यवस्थापिका निता जगताप यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -