घररायगडमुरुड नगर परिषद कर्मचार्‍यांचे आंदोलन

मुरुड नगर परिषद कर्मचार्‍यांचे आंदोलन

Subscribe

मुरुड-:महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या राज्य सरकारने मान्य न केल्याने दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक संतोष पवार आणि अनिल जाधव बेलापूर येथे बेमुदत (worker is strike start two days) उपोषणाला बसले असून, त्यांना पाठिंबा देण्याकरिता नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन केले.

यावेळी रायगड जिल्हा संघटना आणि मुरुड-जंजिरा नगर परिषद संघटना अध्यक्ष राकेश पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आरेकर, खजिनदार संजय वेटकोळी, परेश कुंभार, नंदकुमार आंबेतकर, मनोज पुलेकर, प्रशांत दिवेकर, सतेज निमकर, नितेश माळी, अनंता मोरे, राजू पाटील, सचिन सुभेदार, स्वप्नजा विरकूड, अभिजीत चांदोरकर, संजय भगत उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांच्या हाती वेगवेगळ्या मागण्यांचे फलक होते. मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही क्षणी अत्यावश्यक सेवेसह संपूर्ण काम बंद करण्याचा इशारा उपाध्यक्ष आरेकर यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -