घररायगडजिल्ह्यात नव वर्ष सेलिब्रेशनचा जोष;सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळे, हॉटेल, लॉजिंग, रिसॉर्टस् हाऊसफुल्ल

जिल्ह्यात नव वर्ष सेलिब्रेशनचा जोष;सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळे, हॉटेल, लॉजिंग, रिसॉर्टस् हाऊसफुल्ल

Subscribe

रत्नाकर पाटील: अलिबाग
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी चांगलीच गर्दी केल्याचे आणि थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि माथेरान सह अन्य विभागातील हॉटेल, रेस्टारंट, लॉजींग, कॉटेजेस हाऊसफुल झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात नव वर्ष सेलिब्रेशन जोषात असल्याचे कमालिचे उत्साही चित्र असून हुल्लडबाजी करणार्‍यांवर मात्र नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी विविध पथक तयार केली आहेत. शनिवारी थर्टी फर्स्टची रात्र आणि दुसर्‍या दिवशी रविवार असल्याने पहाटेपर्यंत सेलिब्रेशनची झिंग सुरु राहणार आहे. तर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दिवसभर पर्यटनस्थळी आनंद घेणार आहेत. एकंदरीत जिल्ह्यात नव वर्ष सेलिब्रेशन जोषात साजरे होत असल्याचे चित्र
नाताळ सणानिमित्त आलेल्या पर्यटकांमुळेही जिल्ह्यातील पर्यटन चांगलेच बहरले होते. त्यानंतर आता थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी वीकेंडच्या चार दिवस आधीपासूनच पर्यटकांनी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर मुक्काम ठोकला आहे. जानेवारी २०२३ पर्यंत विविध हॉटेल बुक झालेली आहेत. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध हॉटेल, रेस्टारंट, रिसॉर्टमध्ये नाईट पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मद्याचे पेले रिचवत आणि गाण्याच्या ठेक्यावर पर्यटक धमाल करण्यास सज्ज झाल्याचे चित्र होत तर विविध कॉटेजमध्ये सकाळपासून पर्यटकांचे सेलिब्रेशन सुरु होते. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, काशीद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. माथेरानमध्ये देखील पर्यटकांनी गर्दी केली आहे. मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने हॉटेल, रिसॉर्ट, कॉजेट, लॉजींग, पर्यटनावर आधारित असणार्‍या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चंगळ होत असल्याचे चित्र आहे. या आधी एका रात्रीसाठी सर्वाधिक पॅकेज १० हजार रुपये असायचे. मात्र यामध्ये सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महाग असताना तेही बुकही झाले आहेत. छोटी मोठी हॉटेलही हाउसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.

समुद्र किनार्‍यांसह धार्मिक स्थळे बहरली
पाली येथील बल्लाळेश्वर, महड येथील वरद-विनायक, दिवेआगरच्या गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. मावळत्या वर्षाचा अखरेचा आणि नववर्षाचा पहिला दिवस देवदर्शनाने सुरु करण्याची भावना यामागे असल्याचे दिसून येते. अलिबाग कुलाबा किल्ल्यातील गणपती, हनुमान मंदिरामध्येही मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गेल्या आठवड्यापासून पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यास आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मात्र गर्दीचा उच्चांक मोडला जाणार आहे. विकेंडच्या चार दिवसात १० लाखाहून अधिक पर्यटक रायगडातील पर्यटनाचा आनंद लुटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष महिला पोलीस पथक
महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने साध्या वेशातील पोलीस व महिला अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आलेली आहेत. वाहतुक व्यवस्था सुरळित राहावी म्हणून जवळपास ८६ ठिकाणी ९० वाहतुक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाकडून महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्ह ची विशेष मोहीम
राबविण्यात येत आहे. रायगड जिल्हयामध्ये पोलीस स्टेशन हद्दीतील फिक्स पॉईंट, पेट्रोलिंग, नाकाबंदी याकरीता एकुण ७५ पोलीस अधिकारी, ४१२ पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
—-====================

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -