घररायगडपोलादपूरमध्ये भूमिगत केबलला आग, संपूर्ण तालुका काही तास अंधारात

पोलादपूरमध्ये भूमिगत केबलला आग, संपूर्ण तालुका काही तास अंधारात

Subscribe

महाड औद्योगिक क्षेत्र विकास वसाहतीमधील वीज केंद्रातून भूमिगत केबल टाकून तुर्भे वीज उपकेंद्रात वीज आणण्यातआली आहे. हे भूमिगत केबलचे काम तीन चार वर्षांपूर्वीचे आहे. केबलमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने पोलादपूरमधील ग्रामीण भागाला त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

महाड औद्योगिक विकास क्षेत्र वसाहतीमधील वीज केंद्रातून तुर्भे गावाच्या हद्दीतील वीज उप केंद्रातआणलेल्या विजेच्या मुख्य भूमिगत केबलला लागलेल्या आगीमुळे पोलादपूर शहरासह तालुक्यातील गावे व वाडया गुरुवारी पहाटे दोन वाजेपर्यत अंधारात होत्या. महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा झटका जनतेला पुन्हा बसला आहे. असे प्रकार वारंवार झाल्यास जनतेकडून कधीही उद्रेक होण्याची शक्यता आहे.

पोलादपूर शहर, पोलादपूर ग्रामीण आणि पितळवाडी या तीन विभागांतील गावे, वाड्या, वस्त्यांपर्यंत तुर्भे येथील वीज स्वीचिंग उपकेंद्रातून वीज महावितरण कंपनीने पोहोचवली आहे. महाड औद्योगिक क्षेत्र विकास वसाहतीमधील वीज केंद्रातून भूमिगत केबल टाकून तुर्भे वीज उपकेंद्रात वीज आणण्यातआली आहे. हे भूमिगत केबलचे काम तीन चार वर्षांपूर्वीचे आहे. केबलमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने पोलादपूरमधील ग्रामीण भागाला त्याचा
सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुमिगत केबल जळल्यामुळे पोलादपूर शहरासह तालुक्यातील ८७ गावे आणि अनेक वाडया,वस्त्या अंधारात बुडाल्या.यापूर्वीचे कार्यकारी अभियंता अप्पासाहेब खांडेकर यांच्या कार्यकाळात भूमिगत केबलचे काम झाले आहे. या भूमिगत केबलमध्ये वारंवार दोष निर्माण झाले आहेत. केबल दुरुस्त करण्यात आली असली तरी तिच्याऐवजी नवीन भूमिगत केबल टाकणे आवश्यकआहे. भुमिगत केबलच्या कामाबरोबरच पर्यायी व्यवस्था म्हणून महाड औद्योगिक विकास क्षेत्रातील वीज केंद्रातून नवीन फेडरचे पूर्ण काम तुर्भे उपकेंद्रापर्यंत करण्यात आले आहे. हा फेडर चालू असता तर होणारा खंडीत वीज पुरवठा सुरू करण्यास वेळ लागला नसता. तसेच जनतेलाही पर्यायी व्यवस्थेमुळे दिलासा मिळाला असता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -