घररायगडRaigad School News : रोहे, महाडमध्ये चिमुरड्यांचा शाळांमध्ये 'प्रवेशोत्सव'

Raigad School News : रोहे, महाडमध्ये चिमुरड्यांचा शाळांमध्ये ‘प्रवेशोत्सव’

Subscribe

सहा वर्षे पूर्ण झालेल्या चिमुरड्यांच्या शाळाप्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. रोहे आणि महाड तालुक्यातील शाळांमध्ये या चिमुरड्यांचे लेझिम पथक तसेच बँड वाजवून स्वागत करण्यात आले तर त्यांचे औक्षण करून वर्गात प्रवेश देण्यात आला.

रोहे / महाड : तालुक्यातील धानकान्हे आदिवासी वाडी शाळेसाठी शुक्रवार (१९ एप्रिल) खूप महत्त्वाचा दिवस होता. सहा वर्षे पूर्ण झालेल्या चिमुरड्यांनी शाळेत पहिले पाऊल टाकले. त्यासाठी शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करून या भावी विद्यार्थ्यांना औक्षण करत वर्गात प्रवेश देण्यात आला. त्यांच्या शाळप्रवेशाचे प्रशासनाने लेझिम पथकाच्या गजरात स्वागत केले. या निमित्ताने शाळेचा परिसर या चिमुकल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी बहरला होता.

जून २०२४ तसेच १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत सहा वर्षे पूर्ण करणाऱ्या बालकांचा शुक्रवारी (१९ एप्रिल) शाळेत प्रवेश झाला. रायगड जिल्हा परिषदेच्या धानकान्हे आदिवासी वाडी शाळेत येताना शाळेविषयी असलेली मनातील भीती कमी व्हावी आणि त्याचे शैक्षणिक भविष्य सुखकर तसेच आनंददायी होण्यासाठी येथील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Fort Ropeway : शिवप्रेमींच्या सेवेत रोपवेची चौथी ट्रॉली

यावेळी विद्यार्थ्यांची नोंद करत त्यांची जन्मतारीख, वय, वजन, उंची यांची मोजदाद करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता, सामाजिक आणि भावनिक क्षमता यांचा विचार करून त्यानुसार विविध कार्ड चित्र तथा खेळ घेऊन चाचणी घेण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Roha Play Ground : मैदान नगरपरिषदेचे, मक्तेदारी राजकीय मंडळी, मंडळांची

या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी वर्ग रांगोळी, फुलांनी सजवलेले होते. तर शाळेतील शैक्षणिक साहित्यात विविध कलाकृती, हस्तचित्र, खेळाचे साहित्य, बौद्धिक साधन, स्लोगन फलक मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्वांचा आनंद वाढवणारा सेल्फी पॉईंटही होता. प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी डॉ. श्यामभाऊ लोखंडे प्रमुख पाहुणे होते. तर शाळेचे मुख्याध्यापक मारोतराव कोरडे यांच्यासह इतर शिक्षिका, अंगणवाडी सेविका आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते.

महाड तालुक्यातील शाळा शिंदेकोंड येथेही शाळापूर्व मेळावा

लहानग्यांच्या मनातील शाळेविषयी भीती दूर करण्यासाठी महाड तालुक्यातील शाळा शिंदेकोंड येथे शाळापूर्व तयारी मेळावा झाला. या निमित्ताने सहा वर्षे पूर्ण झालेल्या चिमुरड्यांचे शाळेत बँड वाजून स्वागत करण्यात आले आणि त्यांचे औक्षण करून त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला.

मेळाव्यात शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भाषा विकास, गणन पूर्वतयारी आणि समुपदेशन अशा विविध प्रकारच्या स्टॉलद्वारे विद्यार्थ्यांचा बुद्धिकल जाणून घेण्यात आला. या मेळाव्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल चांढवे शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ वन्नेरे, उपशिक्षक संजय मालुसरे, अंगणवाडी सेविका सुनीता तांबे, निकिता कासारे, प्रणाली जाधव, कांचन पवार, अर्चना वेदपाठक, सुहासिनी सावंत, वैशाली लाड शाळेच्या मुख्याध्यापिका किरण जाधव, उपशिक्षक बालाजी गुबनरे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व पालक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -