घररायगडAccident mangaon : माणगावात अपघाताच्या घटनेची पुनरावृत्ती!

Accident mangaon : माणगावात अपघाताच्या घटनेची पुनरावृत्ती!

Subscribe

माणगावजवळ शिवशाही-रिक्षाच्या अपघातात ठाण्यातील तिघांचा मृत्यू

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. वर्षभरापूर्वी (७ एप्रिल २०२३ रोजी) माणगाव येथे ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघातात झाला होता. या अपघातात दोन लहान नातवांसह ७२ वर्षीय आजीचा मृत्यू झाला होता. माणगावमध्ये झालेल्या अपघाताच्या या घटनेची रविवारी (७ एप्रिल २०२४ रोजी) पुनरावृत्ती झाली आहे. या अपघातात शिवशाही बसने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षातील तिघां प्रवासांचा मृत्यू झाला आहे.(accident in mangain taluka)

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव शहरातील पेट्रोल पंपासमोर शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील तीन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे. तर शिवशाही बसचे मोठे नुकसान झाले आहे.घटना स्थळी स्थानिक नागरिक आणि माणगाव पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

- Advertisement -

हेही वाचा…13 वर्षाच्या चिमुरडीने वाचवला बहिणीचा जीव

मिळालेल्या माहितीनुसार दापोली ते ठाणे (बस क्रमांक एमएच-०९ एफ. एल. ०२४६) हि शिवशाही बस शनिवारी रात्री ठाण्यातील खोपट आगारात दाखल झाली होती. दापोलीहून आलेली ही शिवशाही बस सकाळी सात वाजता ठाण्याहून परतीच्या प्रवासाला निघाली. मुंबई-गोवा महामार्गावरून दापोलीकडे जात असताना हि बस माणगाव मानस हॉटेलनजीक पेट्रोल आली असता हा अपघात झाला. महाड दिशेकडून मुंबईकडे जाणारी ऑटो रिक्षा (एमएच-०४ एफ.सी-६२८२) हि पेट्रोल भरण्याकरीता जाण्यासाठी महामार्गावर बाह्यवळण घेऊन गोव्याच्या दिशेने जात होती. रिक्षाचालकाला समोरून आलेल्या शिवशाही बसचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. या अपघातात रिक्षाचा चुराडा झाला असून रिक्षा चालक दत्तात्रय नामदेव वरंडेकर (वय ५६), राहणार- नौपाडा, ठाणे आणि ठाण्यात राहणारे सहप्रवासी प्रवीण अनंत मालुसरे (वय ५५), गणेश बाबू जाधव (वय ५४) यांना गंभीर दुखापत झाली.जखमींना उपचाराकरिता नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याचप्रमाणे महामार्ग पोलीस पथक तत्काळ दाखल झाले अपघात ग्रस्त वाहने तत्काळ बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाता प्रकरणी माणगाव पोलिसांनी शिवशाही बसचे चालक डी.व्ही.येलवे यांना चौकशी करिता ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा…महामार्गावरील व्हाइट टॅपिंग सिमेंट काँक्रिट कामाचा भोंगळ कारभार

उरण येथे पती पत्नीचा मृत्यू 
रायगड जिल्ह्यातील उरण रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत स्कुटीवरून जाणाऱ्या पती-पत्नीचा मृत्यू झाला. या अपघातात पाच वर्षीची चिमुकली गंभीररित्या जखमी झाली आहे. उरण रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या प्रवेशद्वाराजवळच शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. पवित्र बराल (वय ४०), पत्नी रश्मीता बराल (वय ३४) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात पाच वर्षीय मुलगी परी गंभीररीत्या जखमी झाली आहे.

अपघाताची मालिका सुरुच
१७ सप्टेंबर २०२३: माणगाव जवळील रेपोली येथे ट्रक आणि एसटी बसच्या अपघातात एक जण ठार तर 19 जखमी.
३० नोव्हेंबर २०२३: माणगाव म्हसळा मार्गावर आर्टिका कार अपघातात दोघे जखमी.
२४ फेब्रुवारी २०२४: माणगाव निजामपूर रस्त्यावर खर्डी येथे दुचाकी अपघातात दोघे जखमी.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -