घररायगडजिल्हा परिषदेच्या रिक्त जागांचा तपशील होणार जाहीर

जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांचा तपशील होणार जाहीर

Subscribe

रायगडसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी या महिनाअखेर अथवा पुढील महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिध्द होणार आहे. यादृष्टीने राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या हालचाली झाल्या सुरू असून जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील (वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबतचा अध्यादेश १५ मे २०२३ रोजी प्रसिध्द झाला आहे.

अलिबाग: रायगडसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी या महिनाअखेर अथवा पुढील महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिध्द होणार आहे. यादृष्टीने राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या हालचाली झाल्या सुरू असून जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील (वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबतचा अध्यादेश १५ मे २०२३ रोजी प्रसिध्द झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी डिसेंबर २०२३ पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही ४० आणि मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे करण्यात आली आहे. दरम्यान, नगर जिल्हा परिषदेच्या मंजूर रोष्टरनुसार दोन दिवसांत रिक्त जागांचा तपशील मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांपैकी चार विभागांचे रोष्टर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तपासणी करण्यात आले असून त्याला मान्यता मिळणार आहे.
दरम्यान, रिक्त जागा अंतिम झाल्यावर जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग राज्य शासनाच्या मान्यतेने भरतीसाठी या महिनाअखेर अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिध्द करणार आहे. दुसरीकडे होणार्‍या संभाव्य भरतीसाठी ग्रामविकास विभागाने सविस्तर अध्यादेश काढला आहे. यात भरतीमधील उमेदवारांच्या वयोमर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत. कोविडमुळे दोन वर्षे वाया गेल्याने जिल्हा परिषद भरतीसाठी इच्छुक असणार्या उमदेवारांसाठी दोन वर्षे वयोमर्यादा वाढवण्यात आली आहेत.

वयोमर्यादेचा उमेदवारांना होणार लाभ
डिसेंबर २०२३ पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही ४० आणि मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे करण्यात आली आहे. याचा लाभ संबंधीत उमेदवारांना होणार आहे. यासह भरतीसाठी राबवण्यात येणारी कार्यप्रणाली, ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षा, त्यांची गुणवत्ता यादी, उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, पेसा (अनुसूचित क्षेत्रातील) सरळसेवा पदांबाबत, भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश याबाबतची कार्यप्रणाली ग्रामविभागाने निश्चित केली असून जिल्हा निवड समितीच्यावतीने राबवण्यात येणार्या या भरतीवर विभागीय महसूल आयुक्तयांचे नियंत्रण राहणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -