चोरांचा पाटबंधारे विभागाला ठेंगा, सूचनेनंतरही बिनधास्त पाली भूतीवली धरणातून पाणी चोरी  

कर्जत तालुक्यातील सगळ्यात मोठे धरण असलेल्या पाली भूतीवली धरणातून बेकायदा पाणी उपसा होत असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाने तोंडी सूचना देखील दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ४ दिवसाच्या अल्टिमेटम नंतर देखील पाणी चोरांनी पाटबंधारे विभागाला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे. धरणातून अजूनही पाणी उपसा सुरूच असून धरणात थेट टाकलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे मोठा अनर्थ घडण्याची चिन्हे आहेत. मात्र दुसरीकडे कारवाईची माहिती नसल्याने अडाणी पाटबंधारे विभाग वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवण्यात व्यस्त आहे त्यामुळे पाणी चोरांचे फावले आहे.

कर्जत : तालुक्यातील सगळ्यात मोठे धरण असलेल्या पाली भूतीवली धरणातून बेकायदा पाणी उपसा होत असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाने तोंडी सूचना देखील दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ४ दिवसाच्या अल्टिमेटम नंतर देखी पाणी चोरांनी पाटबंधारे विभागाला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे. धरणातून अजूनही पाणी उपसा सुरूच असून धरणात थेट टाकलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे मोठा अनर्थ घडण्याची चिन्हे आहेत. मात्र दुसरीकडे कारवाईची माहिती नसल्याने अडाणी पाटबंधारे विभाग वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवण्यात व्यस्त आहे त्यामुळे पाणी चोरांचे फावले आहे.
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणीटंचाई ग्रस्त भागातील पाण्याची समस्या दूर व्हावी आणि तेथील परिसर ओलिताखाली यावा म्हणून शासनाच्या पाटबंधारे विभागाने ४०-४२ वर्षांपूर्वी पाली- भुतीवली धरणाची निर्मिती केली. येथील परिसर हिरवागार करण्यासाठी बांधलेले हे धरण पाणी चोरांच्या निशाण्यावर आले आहे.धरणात जलवाहिनी टाकून थेट पाण्याची चोरी दिवसाढवळ्या सुरू आहे. सध्या तेथील ग्रामपंचायत या धरणातून पाझरून जाणारे पाण्यावर योजना राबवत आहेत. मात्र स्थानिक परिसरातील बांधकाम व्यवसायिक आणि फार्म हाउस यांच्याकडून थेट धरणाच्या जलाशयात जलवाहिनी टाकून पाणी उचलून नेले जात आहे. दिवसरात्र तीन ते चार पंप तेथे पाण्याचा उपसा करीत असून पाण्याची उचल सुरू आहे. तर पाणी उपसा करण्यासाठी धरणाच्या पाण्यात थेट जलवाहिनी पंप सोबत विद्युतवाहक तारा देखील सोडण्यात आल्या आहेत.  जलसंधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या मोऱ्या कालव्यांसाठी धरण परिसरात ठेवण्यात आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्या मोऱ्या देखील फार्महाउस मालकांनी पळविल्या तर आता धरणाचे पाणी पाणी व्यवसायासाठी पळविले आहे. मात्र तरीही त्यावर कारवाई करण्यासाठी रायगड लघु पाटबंधारे विभाग कचरत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांमध्ये संताप
माध्यमांत या विषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर संधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी धरण परिसरात पाहणी केली होती. त्यानंतर संबंधित पाणी उपसा करणाऱ्या व्यावसायिकांना ४ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र आज दि.२२ दिवस उलटूनही जलसंधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाचे ४ दिवस संपलेले नाहीत. तर साधे बिल देखील आकारले गेले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाविषयी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पाली भूतीवली धरण परिसरात पाणी उपशाची माहिती समजल्यावर आमच्या शाखा अभियंत्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर संबंधितांना कारवाईसाठी आम्ही ४ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडून अभिप्राय मागवला आहे तो आला कि कारवाई करू.
– एस. डी. शिंदे, उपअभियंता, जलसंधारण विभाग, रायगड लघु पाटबंधारे,