आदित्य ठाकरेंच्या भाषणाची नवी शैली; हसत-खिदळत सरकारवरील राग केला व्यक्त

aditya thackeray

पुणे – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सातत्याने ठाकरे गटाची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदा घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. विविध जाहीर सभांमध्ये सरकारवरील राग व्यक्त केला. मात्र, आज पुण्यात कसब्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंनी केलेल्या जाहीर भाषणात त्यांच्या भाषणाची वेगळीच शैली अनुभवायला मिळाली. सरकारवर तोफ डागत त्यांनी जनतेत हसू फुलवलं तर सरकारला चिमटा काढत त्यांच्यावर टीकाही केली.

हेही वाचा – ‘कसबा हे भाजपाचे आहे, काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाच तर…’, फडणवीसांचा हल्लाबोल

आदित्य ठाकरे यांनी आज कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी प्रचार रॅली आणि सभा घेतली. यावेळी ते बोलत होते की, हा जनसमुदाय पाहता ही विजयाची सभा झाली. आज खरंतर कसब्यात येत असताना मला सांगितलं की २०० मीटरची रॅली आणि त्यानंतर सभेला जायचंय. प्रचाराला सुरुवात झाल्यावर मला वाटलं की हा विजय झाला मग गुलाल कुठेय? शिवसेनेतसोबत काँग्रेसचा हात आल्यास तो पंजा होऊन जातो.

ते पुढे म्हणाले की, प्रचाराला सुरुवात केल्यानंतर खिडकीतून, गच्चीतून पन्नास खोके एकदम ओके असा आवाज येत होता. एकदम ओके बोलल्यानंतर तुमच्या मागे कुठे पोलीस पाठवले? कोणत्या यंत्रणा लावल्यात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांचं भाषण सुरू असतानाच आकाशातून ड्रोन घोंगावत होता. यामुळे आदित्य ठाकरेंच्या भाषणात व्यत्यय निर्माण झाला. त्यामुळे ड्रोन बंद करण्याची सूचना करताना सांभाळून सांभालून आपंल सरकार कसं कोसळलं तसा ड्रोनही कोसळेल, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री असा प्रश्न पडतो. मी असं बोललो की ते मला फोन करून सांगतात की, महाराष्ट्राचाही नाही आणि गुजरातचाही नाही. दिल्ली जिथे बोलेन तिथला मी मुख्यमंत्री. राज्याला एक सीएम आहे एक सुपरसीएम आहेत पण, मरण आमच्या आमदारांच झालंय. सगळे रडत परत येताहेत. मंत्रीमंडळाचा विस्तारच येत नाहीय. त्यांनी आता विस्ताराचं विमान पकडा आणि गुवाहाटीला जा. पण गाजर वाटपाचं कामच होतंय येथे, असं म्हणत आदित्य शिंदे गटावर खोचक टोले लगावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला गेले होते. २८ तासांमध्ये त्यांनी ४० कोटी रुपये खर्च केले. या २८ तासांत कोणाला जाऊन भेटले हे ते सांगत नाहीत. त्यांना शेड्युल्ड सांगितलं तरी देत नाहीत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.