Eco friendly bappa Competition
घर क्रीडा ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी १३ खेळाडू बंगळुरूमध्ये दाखल

ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी १३ खेळाडू बंगळुरूमध्ये दाखल

Subscribe

'इंडिया तायक्वांडो' ह्या अधिकृत राष्ट्रीय संघटनेने कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे 'जुनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा' आयोजित केली आहे. २७ ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघांची निवड करण्यात येणार आहे.

‘इंडिया तायक्वांदो’ ह्या अधिकृत राष्ट्रीय संघटनेने कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे ‘जुनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा’ आयोजित केली आहे. २७ ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघांची निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई, पनवेल व रसायनी मधील १३ खेळाडू विविध क्योरुगी व पुमसे गटांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. (13 players entered for Junior National Taekwondo Championship in Bangalore)

१३ खेळाडूंची नावे

  • क्षितिजा खोले – ५२ किलो खालील मुली
  • पार्थ जाधव – ५५ किलो खालील मुले
  • प्रीति पाटणे – ५५ किलो खालील मुली
  • श्रीजय भगत – ५९ किलो खालील मुले
  • प्रेम पाटणे – ७३ किलो खालील मुले
  • निहाल भोईर – ७८ किलो खालील मुले
  • प्रणित टाचतोडे व समृद्धी कापसे – पुमसे मिश्र जोडी
  • सुबोध दळवी, चैतन्य नागने, प्रेम पाटणे – पुमसे सांघिक मुले
  • किरण कदम, संस्कृती पाटील, निशीता पाडेकर – पुमसे सांघिक मुली
- Advertisement -

याशिवाय राष्ट्रीय प्रशिक्षक सचिन शंकर माळी व तुषार तानाजी सिनलकर यांची महाराष्ट्राचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.

या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सचिन माळी, संजय भोईर तसेच तुषार सिनलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून नवी मुंबई महानगरपालिका महापौर जयवंत सुतार तसेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे याशिवाय अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडच्या अध्यक्षा एड. प्रज्ञा भगत, सचिव सचिन माळी, उपाध्यक्ष संजय भोईर, खजिनदार रोहित सिनलकर इत्यादी मान्यवरांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – टी-२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक; भारतीय महिला संघ अंतिम सामन्यात दाखल

- Advertisment -