घरक्रीडाटी-२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक; भारतीय महिला संघ अंतिम सामन्यात दाखल

टी-२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक; भारतीय महिला संघ अंतिम सामन्यात दाखल

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक सामने सुरु आहेत. शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझिलंडच्या संघाला भारतीय संघाने कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्त्वात १०९ धावांवरच रोखले. त्यानंतर भारतीय महिला संघाने दर्जेदार फलंदाजी करत आठ खेळाडू राखून न्यूझिलंड संघावर विजय मिळवला. भारतीय संघाने १४.२ षटकांत दोन बाद ११० धाव केल्या.

नवी दिल्लीः अंडर-१९ टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने न्यूझिलंडच्या संघावर मात करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दुसरा उंपात्य सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. या सामन्यातील विजयी संघासोबत भारतीय संघाची अंतिम लढत होईल.

दक्षिण आफ्रिकेत महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक सामने सुरु आहेत. शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझिलंडच्या संघाला भारतीय संघाने कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्त्वात १०७ धावांवरच रोखले. त्यानंतर भारतीय महिला संघाने दर्जेदार फलंदाजी करत आठ खेळाडू राखून न्यूझिलंड संघावर विजय मिळवला. भारतीय संघाने १४.२ षटकांत दोन बाद १०८ धाव केल्या.

- Advertisement -

उपांत्य सामन्यात नाणेफेक जिकंत भारतीय संघाने न्यूझिलंडच्या संघाला प्रथम फलंदाजीस प्राधान्य दिले. भारतीय महिला संघाच्या आक्रमक गोलंदाजी समोर न्यूझिलंड संघाचा टिकाव लागला नाही. न्यूझिलंड महिला संघाच्या धावा रोखण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. अगदी पहिल्या षटकापासूनच भारतीय महिला संघाने दर्जेदार खेळ खेळत न्यूझिलंड संघाला धावा करण्यापासून रोखले.

न्यूझिलंड संघाची सलामीची फलंदाज अन्ना ब्रोनिंग १ तर इम्मा २ धावा करुन तंबूत परतल्या. जॉर्जिया प्लिमर हिने ३५ धावा केल्या. जॉर्जियाच्या फलंदाजीमुळे न्यूझिलंडचा संघ १०० धावा पार करु शकला. न्यूझिलंड संघाची यष्टीरक्षक इसाबेला गेझ हिने २६ धावा केल्या. गेझच्या नंतर न्यूझिलंडच्या कोणत्याच फलंदाजाचा भारतीय महिला गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. न्यूझिलंड संघाने २० षटकांत ९ बाद १०७ धावा केल्या.

- Advertisement -

भारतीय महिला संघाची गोलंदाज पार्श्र्वरी चोप्रा हिने ४ षटकांत २० धाव देऊन सर्वाधिक ३ बळी घेतले. तर टिटास साधू, मन्नत कश्यप, शेफाली वर्मा व अर्चना देवी यांनी प्रत्येकी न्यूझिलंडचा एक खेळाडू बाद केला. भारतीय महिला संघाच्या फलंदाजांनी धुवांधार फलंदाजी करत १०८ धावांचे लक्ष साध्य केले व अंतिम सामान्यात प्रवेश केला. भारतीय संघ अंतिम सामन्यात उत्तम कामगिरी करुन विश्वचषकावर आपले नाव कोरले, अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमी करत आहेत.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -