Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये आयपीएलच्या ४ फ्रँचायझींनी विकत घेतले संघ

अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये आयपीएलच्या ४ फ्रँचायझींनी विकत घेतले संघ

Subscribe

नवी दिल्ली : इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेनंतर आता अमेरिकेतही टी-20 क्रिकेट लीग सुरू होणार आहे. मेजर लीग क्रिकेटची ही पहिली आवृत्ती जुलैमध्ये खेळवली जाईल. यामध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघांपैकी चार संघाना आयपीएल फ्रँचायझींने विकत घेतले आहे. मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या आवृत्तीसाठी, आज खेळाडूंवर बोली लावण्यात आली. या बोलीमध्ये नामांकित खेळाडूंसोबत अनोळखी आणि अमेरिकन खेळाडूंवरही संघानी बोली लावली आहे. ह्यूस्टनमधील नासाच्या स्पेस सेंटरमध्ये मेजर लीगचे किक्रेटच्या बोलीचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या फेरीमध्ये एकूण 54 खेळाडूंना विकत घेण्यात आले आहे. यामध्ये क्विंटन डिकॉक, अॅरॉन फिंच, मार्कस स्टॉइनिस, वानिंदू हसरंगा, एनरिक नोर्किया, मिचेल मार्शसारख्या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत अनेक खेळाडू ड्राफ्टचा भाग असतील. एक संघ जास्तीत जास्त 18 खेळाडू जोडू शकतो. फिंचला सॅन फ्रान्सिस्कोने विकत घेतले असून त्याला कर्णधार बनवले आहे. या संघाने न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू कोरी अँडरसन आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेट यांनाही विकत घेतले आहे.

- Advertisement -

इतर मोठ्या नावांमध्ये, उन्मुक्त चंद, ज्याने भारताला 2012 अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला, त्याला एलए नाइट रायडर्सने विकत घेतले. यासोबत जसकरण मल्होत्रा, अली खान आणि कॅनडाचा माजी कर्णधार नितीश कुमार यांचीही निवड करण्यात आली आहे. चंदचा भारताच्या अंडर-19 संघातील सहकारी हरमीत सिंगला सिएटल ऑर्कासने विकत घेतले आहे. मुंबई इंडियन्सने अमेरिकेचा कर्णधार स्टीव्हन टेलरला घेतले.

अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये चार संघाचे आयपीएल कनेक्शन
1. मुंबई इंडियन्सने न्यूयॉर्क फ्रँचायझी विकत घेतली असून एमआय न्यूयॉर्क असे नाव दिले आहे.
2. चेन्नई सुपर किंग्जने टेक्सास फ्रँचायझी विकत घेतली आहे. ही फ्रँचायझी विकत घेण्यात एका स्थानिक गुंतवणूकदाराचाही समावेश आहे. चेन्नईने संघाने नाव अद्याप ठरवले नसले तरी या फ्रँचायझीला टेक्सास एमएलसी संघ म्हटले जाऊ शकते.
3. कोलकाता नाईट रायडर्सने लॉस एंजेलिस फ्रँचायझी विकत घेतली आहे. ही फ्रँचायझी लॉस एंजेलिस नाइट रायडर्स या नावाने ओळखली जाईल.
4. दिल्ली कॅपिटल्सने सिएटल फ्रँचायझी विकत घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्ससोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला हे देखील या फ्रँचायझीमध्ये शेअरहोल्डर आहेत. सिएटल ऑर्कास असे या फ्रँचायझीचे नाव आहे.
5. वॉशिंग्टन डीसी फ्रँचायझी अमेरिकन गुंतवणूकदार संजय गोविल यांच्या मालकीची आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या होम टीम न्यू साउथ वेल्सशीही करार केला आहे. वॉशिंग्टन फ्रीडम असे या संघाचे नाव आहे.
6. सॅन फ्रान्सिस्को फ्रँचायझी आनंद राजारामन आणि वेंकी हरिनारायणन यांच्या मालकीची आहे. त्यांनी क्रिकेट व्हिक्टोरियाशी हातमिळवणी केली आहे. या फ्रँचायझीचे नाव सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -