घरक्रीडाप्रेमकथेचे रुपांतर लग्नात झाले; शुभमन गिलच्या फलंदाजीवर सेहवागचे विधान व्हायरल

प्रेमकथेचे रुपांतर लग्नात झाले; शुभमन गिलच्या फलंदाजीवर सेहवागचे विधान व्हायरल

Subscribe

नवी दिल्ली : सोमवारी (15 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर शुभमन गिलने (Shubman Gill) फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला. यावेळी त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. गिलच्या या खेळीनंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) त्याचे कौतुक करताना एक विधान केले आहे. जे सध्या व्हायरल झाले आहे.

सेहवाग स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, “माझ्या मते गिलच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा अध्याय आहे. मला असे म्हणायचे आहे की, प्रेमकथेचे रुपांतर लग्नात झाले आहे. त्याची खेळी बघताना असे वाटते होते की, तो दुसऱ्याच मैदानावर खेळत आहे. कारण या मैदानावर इतर फलंदाज फलंदाजी करताना झगडताना दिसत होते, त्याचवेळी गिल सहज चौकार षटकार मारत होता. शुभमन गिलबद्दल आम्ही खूप दिवसांपासून बोलत आहोत. या वर्षी त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटीतही शतक झळकावले आहे. याशिवाय एकदिवसीय सामन्यांमध्येही त्याने द्विशतक झळकावले आहे. आता त्याने आयपीएलमध्येही शतक केले आहे.

- Advertisement -

शुभमन गिलला अहमदाबादचे मैदान रास
शुभमन गिलने आयपीएल २०२३ मध्ये आपली सर्व अर्धशतके नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम झळकावली आहेत. त्यामुळे त्याला हे मैदना रास येते असेच दिसते. त्याचे आयपीएलमधील पहिले शतकही नरेंद्र मोदी स्टेडियमवर आले आहे. विशेष म्हणजे शुभमन गिलने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 शतके ठोकली आहेत. त्यातील दोन शतके आंतरराष्ट्रीय शतके नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आली आहेत. शुभमन गिलने गुजरात टायटन्ससाठी 1000 धावा पूर्ण केल्या. याशिवाय त्याने  सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तुफानी फलंदाजी करताना गिलने अवघ्या 58 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 101 धावांची शानदार खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे गुजरात टायटन्स 188 धावांचा टप्पा गाठू शकली आणि हैदराबादचा 34 धावांनी पराभव करत प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -