घरक्रीडामोठा खुलासा! बॉल टेम्परिंगमागे संपूर्ण टीम, स्मिथने चूक स्वत:च्या अंगावर घेतली

मोठा खुलासा! बॉल टेम्परिंगमागे संपूर्ण टीम, स्मिथने चूक स्वत:च्या अंगावर घेतली

Subscribe

संघातील इतर सदस्य या गोष्टीमध्ये सहभागी नव्हते यावर माझा विश्वास नाही, असं अँड्र्यू फ्लिंटॉफ म्हणाला.

विश्व क्रिकेटला धक्का बसणार्‍या २०१८ मधील बॉल टेम्परिंग वादात संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाचा सहभाग होता, परंतु कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या संघाला वाचवण्यासाठी स्मिथने स्वत: वर दोष ओढवून घेतला. असा खुलासा इंग्लंडचा माजी अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफ याने केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केपटाऊनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात स्मिथ व्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट हेही या ‘सॅंडपेपर-गेट’ प्रकरणात सामील असा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. फ्लिंटॉफने टॉकस्पोर्टशी बोलताना म्हटलं की, “संपूर्ण टीम यात सामील नव्हती यावर माझा विश्वास नाही. जर कोणी मला गोलंदाज म्हणून चेंडू दिला आणि त्यात छेडछाड केली गेली तर मला सुरुवातीपासूनच कळेल. स्टीव्ह स्मिथने सर्वांची चूक स्वत: च्या अंगावर घेतली.”


हेही वाचा – निवृत्ती नाहीच! धोनी पुनरागमनासाठी खेळणार ‘ही’ स्पर्धा

- Advertisement -

फ्लिंटॉफ पुढे म्हणाला, “बॉल टेम्परिंग आधीपासून होत आहे आणि मला वाटतं की एक मर्यादा आहे ज्यानंतर कोणीतरी असं करतं. आमच्यावरही चेंडूवर जेली लावल्याचा आरोप करण्यात आला. चेंडूवर लोक सनस्क्रीन क्रीमदेखील लावतात, शक्य तितक्या सर्व गोष्टी करून पाहिल्या आहेत.”

स्मिथवर दोन वर्ष कर्णधारपदावरही बंदी होती. संघातील अन्य सदस्यांना काय घडत आहे हे माहित नव्हतं यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. फ्लिंटॉफ म्हणाला, “सॅंडपेपर चुकीचा आहे, परंतु संघातील इतर सदस्य या गोष्टीमध्ये सहभागी नव्हते यावर माझा विश्वास नाही.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -