घरक्रीडानिवृत्ती नाहीच! धोनी पुनरागमनासाठी खेळणार 'ही' स्पर्धा

निवृत्ती नाहीच! धोनी पुनरागमनासाठी खेळणार ‘ही’ स्पर्धा

Subscribe

आयपीएल रद्द झाल्यामुळे धोनीच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

महेंद्रसिंग धोनीने २०१९ विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. यामुळे धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चांना उधाण आलं. २०१९ विश्वचषकानंतर विश्रांती घेतली होती. त्यामुळे तत्कालीन निवड समितीने धोनीच्या जागी ऋषभ पंतला संघात घेण्यात आलं. तेव्हापासून आतापर्यंत धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. शिवाय, आपल्या निवृत्तीबद्दल धोनीने अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. Sportskeeda या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार धोनी २०२१ वर्षात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत झारखंड कडून खेळण्याच्या तयारीत आहे.

धोनी झारखंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या कायम संपर्कात आहे. लॉकडाऊन घोषित होण्याआधी धोनी झारखंडच्या मैदानावर आयपीएलसाठी सरावही करत होता. यानंतर आयपीएलसाठी तो चेन्नईला रवाना झाला. मात्र, कोरोनामुळे आयपीएल कँप रद्द झाल्याने धोनी परत झारखंडला परतला. आयपीएल रद्द झाल्यामुळे धोनीच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, “धोनीने पुढच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त करत झारखंड क्रिकेट असोसिएशनकडे तसा प्रस्तावही त्याने पाठवला आहे. शिवाय, त्याने झारखंड क्रिकेटमध्ये सक्रीय होण्याची इच्छाही बोलून दाखवली.

- Advertisement -

हेही वाचा – चेंडूला थुकी लावावी की नाही,करोनामुळे गोलंदाजांपुढे प्रश्न!


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी धोनीला भारतीय संघात स्थान मिळावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. विश्वचषक संघात धोनीची निवड ही त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून होती. यासाठी धोनीने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी कठोर मेहनत घेत होता. मात्र देशात सध्या कोरोनामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित केलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -