घरक्रीडाAsian Fencing championship : भवानी देवीने इतिहास रचला; तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली...

Asian Fencing championship : भवानी देवीने इतिहास रचला; तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय

Subscribe

Asian Fencing championship : नवी दिल्ली : सीए भवानी देवीने (Bhavani Devi) आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत इतिहास रचला आहे. चीनमधील वूशी येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियनचा पराभव करत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. या स्पर्धेतील महिलांच्या सेबर स्पर्धेत भवानीने कांस्यपदक जिंकले आहे. या चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी भवानी ही पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. (Asian Fencing championship: Bhavani Devi creates history; First Indian to win a medal in fencing)

आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने प्रभावी कामगिरी केली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या जपान आणि जागतिक क्रमवारीत नंबर-1 असलेल्या मिसाकी इमुरा हिचा 15-10 असा पराभव करून कांस्यपदकावर नाव कोरले. भवानी देवीने आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. भवानी देवीने संपूर्ण सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनवर वर्चस्व मिळवले.  मिसाकीला तिने सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिलीच नाही.

- Advertisement -

 

- Advertisement -

भवानी देवीचं आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये आतापर्यंत दमदार प्रदर्शन राहिले आहे. भवानी देवीला 64 च्या राउंडमध्ये बाय मिळाला, त्यानंतर तिने पुढच्या फेरीत कझाकिस्तानच्या डोस्पे करिनाचा पराभव केला. भवानीनेही प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भवानी देवीने जापानच्या सिरी ओजाकी हिचा 15-11 असा पराभव केला होता.  सिरी 2022 वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये ब्रॉन्ज पदक जिंकणाऱ्या संघाची सदस्य होती. भवानी देवीने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे.

भवानी देवीने टोकियो ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. यासह भवानी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय ठरली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये, भवानीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अझी हिचा सेबर स्पर्धेत पराभव केला होता. हा ऑलिम्पिक इतिहासातील भारताचा पहिला तलवारबाजीचा सामना होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भवानीला राउंड-32 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. 29 वर्षीय भवानी देवीने याआधी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्येही दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.

भवानी देवीने तलवार बाजीच्या प्रत्येक स्पर्धेत केली दमदार कामगिरी

आठ वेळा नॅशनल चॅम्पियन असणाऱ्या भवानी देवीने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप टीम इवेंट्समध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक जिंकले होते, तर याच चॅम्पियनशिपच्या इंडिव्ह्युजअल इवेंटमध्येही भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. भवानी देवीने 2010 च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -