घरक्रीडाAsian games 2018: हॉकीमध्ये भारताचा विश्वविक्रम

Asian games 2018: हॉकीमध्ये भारताचा विश्वविक्रम

Subscribe

भारतासाठी आनंदाची गोष्ट अशी की, भारतीय हॉकी टीमने गेल्या ८६ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. १९३२ साली झालेल्या एशियन गेम्समध्ये भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात भारताने २४ गोल्सचा विक्रम केला होता.

एशियन्स गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आतापर्यंत ४ सुवर्णपदक, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकावर नाव कोरले. आता भारताने हॉकीमध्ये विश्वविक्रमही केला आहे. आज हाँग काँग चीन विरुद्ध भारत अशा रंगलेल्या हॉकी सामन्यात भारताने एक दोन नव्हे तर तब्बल २६ गोल करत विजय मिळवत आणखी एक साखळी फेरी जिंकली आहे. जकार्तामध्ये सध्या एशियन गेम्स सुरु असून ही गोलसंख्या करत हॉकी टीमने स्वत: चाच रेकॉर्ड तोडला आहे.

असा झाला सामना?

हाँगकाँग चीनला आज भारतीय हॉकी टीमने एकही गोल करु दिला नाही. तर भारतीय संघाने तब्बल २६ गोल केले. विरुद्ध संघाला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. एका मॅचमध्ये इतक्या मोठ्या संख्येने गोल करणारा भारत हा एकमेव संघ आहे. आकाशदिप सिंह, रुपिंदर सिंह, ललित उपाध्याय आणि हरमनप्रीत सिंह यांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. हरमनप्रीत सिंगने चार गोल करत हॅट्रिक केली आहे. जकार्ताच्या मैदानावर हा पहिल्यांदाच विश्वविक्रम झाला आहे.

- Advertisement -

 वाचा- Asian Games 2018: भारताची ‘राही सरनोबत’ला पिस्तूल स्पर्धेत गोल्ड

८६ वर्षांचा तोडला विक्रम

भारतासाठी आनंदाची गोष्ट अशी की, भारतीय हॉकी टीमने गेल्या ८६ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. १९३२ साली झालेल्या एशियन गेम्समध्ये भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात भारताने २४ गोल्सचा विक्रम केला होता. त्यानंतर १९८२ साली झालेल्या एशियन गेम्समध्ये बांग्लादेशविरुद्ध सामन्यात १२-० असा रेकॉर्ड केला होता. आणि आता जकार्तामध्ये सुरु असलेल्या हॉकी सामन्यात भारतीय टीम दमदार कामगिरी करत आहे. या साखळी सामन्यातील लक्षणीय कामगिरीनंतर भारतीय हॉकी टीमकडून पदाची अपेक्षा आहे.

वाचा- Asian Games 2018 : भारतीय महिला कबड्डी संघाची इंडोनेशियावर मात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -