घरक्रीडाऑस्ट्रेलियाच सर्वोत्तम! - बोल्ट

ऑस्ट्रेलियाच सर्वोत्तम! – बोल्ट

Subscribe

क्रिकेट विश्वचषकात शनिवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने आपला सलग पाचवा आणि एकूण आठ सामन्यांतील सातवा विजय मिळवला. याआधीच्या सामन्यात इंग्लंडवर मात करत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला होता. तसेच सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी त्यांचा मिचेल स्टार्क आणि सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत त्यांचाच डेविड वॉर्नर आहे. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाच या विश्वचषकातील सर्वोत्तम संघ आहे, असे मत न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टने व्यक्त केले.

विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ वेगळ्याच जिद्दीने खेळतो. त्यांची विश्वचषकातील कामगिरी उत्कृष्ट आहे आणि ते या स्पर्धेतही योग्य वेळी चांगले प्रदर्शन करत आहेत. या स्पर्धेत बरेच चांगले संघ आहेत. मात्र, जो संघ मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावतो, तोच संघ सर्वोत्तम असतो असे मला वाटते. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या खूपच अप्रतिम खेळत आहे. ही स्पर्धा अजून केवळ दोन आठवडे चालणार आहे. त्यामुळे सध्यातरी ऑस्ट्रेलियाचाच संघ सर्वोत्तम आहे, असे बोल्ट म्हणाला.

- Advertisement -

बोल्टने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला. याबाबत त्याने सांगितले, मी शेवटच्या नाही, तर पहिल्या षटकात हॅटट्रिक घेतली असती, तर मला जास्त आनंद झाला असता. मात्र, सलग तीन चेंडूंवर विकेट घेणे हे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते आणि मला लॉर्ड्सवर अशी कामगिरी करता आली ही गोष्ट माझ्यासाठी खास आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -