घरक्रीडाटीम इंडियाचे जून २०२२ पर्यंतचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणता देश येणार...

टीम इंडियाचे जून २०२२ पर्यंतचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणता देश येणार आमने-सामने

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचे जून २०२२ पर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने सोमवारी टीम इंडियाचा हा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत ४ कसोटी, १४ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि फक्त ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, न्यूझीलंड नोव्हेंबर-डिसेंबर, वेस्ट इंडीज फेब्रुवारी २०२२, श्रीलंका फेब्रुवारी-मार्च २०२२ आणि दक्षिण आफ्रिका जून २०२२ मधील संघ ८ महिन्यांच्या कालावधीत भारताचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

यादरम्यान, भारतीय संघ डिसेंबर २०२१ जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार असून इंडियन प्रीमियर लीग एप्रिल-मे २०२२ मध्ये होणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी आणि २ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे, तर वेस्ट इंडिजविरुद्ध ३ एकदिवसीय आणि ५ टी-२०आंतरराष्ट्रीय सामने आहेत. भारत दौऱ्यावर श्रीलंका संघ २ कसोटी आणि २ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. तर दक्षिण आफ्रिकन संघाचा भारतीय दौरा फक्त १० दिवसांचा असणार आहे, ज्यामध्ये त्यांना ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने ठेवले आहेत कारण एका वर्षाच्या आत ऑस्ट्रेलियामध्ये आणखी एक विश्वचषक होणार आहे. आम्हाला त्या मोठ्या स्पर्धेपूर्वी पुरेसे सामने खेळण्याची आवश्यकता आहे.

४ कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडविरुद्धचे दोन सामने कानपूर आणि मुंबई येथे खेळले जाणार आहेत, तर श्रीलंकेविरुद्धचे सामने बंगळुरू आणि मोहालीकडे सोपवण्यात आले आहेत. रोटेशन पॉलिसी अंतर्गत १७ मर्यादित षटकांच्या सामन्यांचे ठिकाण निवडण्यात आले असून ज्यामध्ये जयपूर, रांची, लखनौ, विशाखापट्टणम, कोलकाता, अहमदाबाद, कटक, त्रिवेंद्रम, चेन्नई, राजकोट, दिल्ली यांना यजमानपदाची संधी मिळणार आहे.


Rain Update : राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस, मराठवाड्यात यलो अलर्ट जारी

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -