घरक्रीडाभुवनेश्वर आयसीसीच्या 'या' पुरस्काराने सन्मानित 

भुवनेश्वर आयसीसीच्या ‘या’ पुरस्काराने सन्मानित 

Subscribe

मी आयसीसी आणि मला मत देणारे चाहते यांचे आभार मानतो, असे भुवनेश्वर म्हणाला.

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मार्च महिन्यात भुवनेश्वरने इंग्लंडविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिकेमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. ३१ वर्षीय भुवनेश्वरने तीन एकदिवसीय सामन्यांत केवळ ४.६५ च्या इकोनॉमीने धावा देताना चार विकेट घेतल्या होत्या. त्याआधीच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने केवळ ६.३८ च्या इकोनॉमीने धावा दिल्या होत्या. त्यामुळे भुवनेश्वरने अफगाणिस्तानच्या राशिद खान आणि झिम्बाब्वेच्या सिन विल्यम्सला मागे टाकत मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार आपल्या नावे केला.

भारतीय संघात पुनरागमन केल्याचा आनंद  

मला बराच काळ दुखापतींमुळे मैदानाबाहेर राहावे लागले होते. मात्र, भारतीय संघात पुनरागमन केल्याचा आनंद आहे. मी माझ्या फिटनेस आणि खेळावर खूप मेहनत घेतली. त्यामुळे देशाचे प्रतिनिधित्व करताना पुन्हा विकेट घेऊ शकल्याचे समाधान आहे. मी माझ्या कुटुंबियांचे, मित्रांचे आणि भारतीय संघातील सहकाऱ्यांचे आभार मानतो. त्यांचा पाठिंबा खूप महत्वाचा होता. तसेच मला महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी आयसीसी आणि मला मत देणारे चाहते यांचेही आभार मानतो, असे भुवनेश्वर म्हणाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -