घरक्रीडाहॅरी ब्रुकची वादळी खेळी, कांबळीचा ३० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास

हॅरी ब्रुकची वादळी खेळी, कांबळीचा ३० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास

Subscribe

इंग्लंडचा वेगवान खेळाडू हॅरी ब्रूकने भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा ३० वर्षांपूर्वीचा जुना रेकॉर्ड मोडला आहे. कसोटी कारकिर्दीतील पहिल्या ९ डावात ८०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात हॅरी ब्रूकने इंग्लंडसाठी चांगली कामगिरी केली आहे.

हॅरी ब्रूकने न्यूझीलंडविरुद्ध १६९ चेंडूत नाबाद १८४ धावांची खेळी केली. या खेळीमुळे इंग्लंडचा युवा फलंदाज त्याच्या पहिल्या नऊ कसोटी डावांत ८०० धावा करणारा इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी ९ कसोटी डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (७९८) च्या नावावर होता, मात्र आज हॅरी ब्रूकने हा विक्रम मोडला. त्याच्या नावावर आता ८०७ धावांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

याआधी ‘या’ फलंदाजांची नावे विश्वविक्रमात…

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफने ९ डावात ७८० धावा, सुनील गावस्करने ९ डावात ७७८ धावा आणि एव्हर्टन वीक्सने ९ डावात ७७७ धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूकने सर्व दिग्गजांना मागे टाकत ८०७ धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक व्यतिरिक्त जो रूटने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद १०१ धावा केल्या होत्या. पाऊस येण्यापूर्वी इंग्लंडने ३ गडी गमावून ३१५ धावा केल्या होत्या.

- Advertisement -

हॅरी ब्रूकच्या आधी हा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर होता. त्याने ९ डावात १००च्या सरासरीने ७९८ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने ४ शतकं आणि एक अर्धशतकं ठोकले होते.


हेही वाचा : यंदाची आयपीएल मोफत पाहायला मिळणार; अंबानींची स्पेशल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -