घरमहाराष्ट्रशिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार; संजय राऊत, अंधारेंचे महाराष्ट्रभर शिवगर्जना अभियान

शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार; संजय राऊत, अंधारेंचे महाराष्ट्रभर शिवगर्जना अभियान

Subscribe

Shivgarjana Abhiyan | मुंबई – एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर, निवडणूक आयोगानेही शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून पक्षनेतृत्त्वाला आता पुन्हा पहिल्यापासून पक्षबांधणीची तयारी करावी लागणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी विविध अभियानातून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान राबवण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार असून या अभियानाअंतर्गत ठाकरे गटाचे नेते, उपनेते आणि युवासेनेचे पदाधिकारी जनतेशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा मुख्यमंत्री रोड-शोमध्ये उतरल्याचे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले; पवारांचा शिंदेंना टोला

- Advertisement -

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान नेते, उपनेते, माजी आमदार आणि युवासेना पदाधिकाऱ्यांवर शिवगर्जना अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शनिवार, २५ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या या शिवगर्जना अभियानाने निष्ठावान शिवसैनिकांकडून महाराष्ट्र पिंजून काढण्यात येणार आहे. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते खासदार. प्रियांका चतुर्वेदी, विनोद घोसाळकर, विजय कदम, किशोरी पेडणेकर, मीना कांबळी, विशाखा राऊत, नितीन बानगुडे पाटील, ज्योती ठाकरे, संजना घाडी, अमोल कीर्तिकर, लक्ष्मण वडले, सुषमा अंधारे, मनोज जामसुतकर, खासदार राजन विचारे, खासदार संजय बंडू जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अनिल कदम, डॉ. जयप्रकाश मुंदडा, डॉ. सुजित मिणचेकर, विजय औटी, शिवाजी चोथे, तुकाराम काते, योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, रामकृष्ण मडावी, सुभाष वानखेडे, उल्हास पाटील, बाबुराव माने आणि लक्ष्मण हाके, अनिष गाढवे, महिला आघाडी तृष्णा विश्वासराव, राजुल पटेल, शुभांगी पाटील तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शीतल देवरुखकर शेठ, दुर्गा शिंदे, पवन जाधव, शरद कोळी, अंकित प्रभू, सुप्रदा फातर्पेकर, प्रवीण पाटकर, हर्षल काकडे, साईनाथ दुर्गे, विक्रांत जाधव, राजोल पाटील आदी पदाधिकारी महाराष्ट्रात फिरून शिवगर्जना अभियानात सहभागी होऊन राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा – खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल, आव्हाडांनी व्यक्त केला संताप

- Advertisement -

तसंच, विभागनिहाय पदाधिकाऱ्यांनी निवड करण्यात आली असून महाराष्ट्रात फिरून शिवगर्जना अभियानात सहभागी होऊन राज्यातील जनतेशी संवाद साधतील, असंही ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे – सुभाष देसाई, उपनेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत, आमदार तुकाराम काते, महिला आघाडी तृष्णा विश्वासराव, युवासेना राजोल पाटील

ठाणे, पालघर जिल्हे – खासदार राजन विचारे, आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, विभागसंघटक राजुल पटेल, युवासेना शितल देवरुखकर-शेठ संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांकरिता आमदार अनिल कदम, डॉ. जयप्रकाश मुंदडा, उपनेत्या किशोरी पेडणेकर, युवासेना अंकित प्रभू

नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली जिल्हे – खासदार संजय (बंडू) जाधव, उपनेते नितीन बानुगडे पाटील, उपनेत्या ज्योती ठाकरे, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, युवासेना प्रविण पाटकर

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्हे –  शिवसेना नेते अनंत गीते, उपनेत्या संजना घाडी, आमदार विजय औटी, युवासेना सचिव वरुण सरदेसाई

नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्हे – शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते लक्ष्मण वडले, अमोल कीर्तिकर, आमदार शिवाजी चोथे, युवासेना पवन जाधव

चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम जिल्हे – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, युवासेना हर्षल काकडे, शरद कोळी, दुर्गा शिंदे

बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्हे – खासदार ओमराजे निंबाळकर, उपनेत्या सुषमा अंधारे, महिला आघाडी शुभांगी पाटील, आमदार रामकृष्ण मडावी, प्रवक्ते अनिष गाढवे

नगर, सोलापूर, पुणे जिल्हे – उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम, आमदार सुभाष वानखेडे, उल्हास पाटील, युवासेना साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्पेकर

कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्हे – शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, प्रवक्ते  लक्ष्मण हाके, आमदार बाबुराव माने, युवासेना विक्रांत जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -