घरक्रीडाभारताच्या नव्या प्रशिक्षकासाठी 'या' खेळाडूंच्या नावाची चर्चा

भारताच्या नव्या प्रशिक्षकासाठी ‘या’ खेळाडूंच्या नावाची चर्चा

Subscribe

भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टी-20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर टीकेला सामोरे जावे लागले होते. विश्वचषकात समतोल संघ बनवण्यात राहुल द्रविड पूर्णपणे अपयशी राहिले. एवढेच नाही तर मायदेशातील राहुल द्रविडच्या खराब प्रशिक्षणामुळे संघाला कामगिरीच्या बाबतीत पूर्णपणे मागे ढकलले आहे.

भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टी-20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर टीकेला सामोरे जावे लागले होते. विश्वचषकात समतोल संघ बनवण्यात राहुल द्रविड पूर्णपणे अपयशी राहिले. एवढेच नाही तर मायदेशातील राहुल द्रविडच्या खराब प्रशिक्षणामुळे संघाला कामगिरीच्या बाबतीत पूर्णपणे मागे ढकलले आहे. दरम्यान, विश्वचषक स्पर्धा, त्यानंतर न्यूझिलंड, आणि बांगलादेश दौऱ्यात भारतीय संघाची खराब कामगिरी होत असल्यामुळे हे तीन दिग्गज भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक बनण्याची शक्यता आहे. (cricket bcci considering appointing new coach for India)

प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या खराब प्रशिक्षणामुळे त्याच्यावर सर्वच स्तरावरून टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच त्याच्या जागी येणाऱ्या भारताच्या नव्या प्रशिक्षकांच्या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हसन यांचा समावेश आहे. त्यामुळे भारताचा पुढील प्रशिक्षक कोण असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

टी-20 विश्वचषक 2021मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाची संघाचा मार्गदर्शक म्हणून घोषणा करण्यात आली. धोनीची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तो लवकरच प्रशिक्षक बनण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली. भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी खूप उत्सुक आहे. यासाठी त्यांनी बीसीसीआयच्या निवड प्रक्रियेअंतर्गत अनेकवेळा अर्ज केला आहे. रवी शास्त्री यांच्या काळापासून सेहवाग भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. मात्र राहुल द्रविड याला प्रशिक्षकपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआय त्याच्या नावावर विचार करू शकते.

- Advertisement -

न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हसन हे आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संचालक आहेत. हसनच्या कोचिंगमध्ये न्यूझीलंड संघाने अनेक मोठे पराक्रम केले आहेत. हसन 2012 मध्ये प्रशिक्षक बनले आणि संघाने 2015 वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीही माइक हसनच्या कोचिंग स्किल्सबद्दल जागरूक आहे. अशा परिस्थितीत राहुल द्रविडनंतर बीसीसीआय भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी हेसनच्या नावावर विचार करू शकते.


हेही वाचा – बांगलादेशची भारतावर मात, मालिकेत मिळवली 1-0 ची आघाडी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -