घरक्रीडानाशिकचा दीपक डंबाळे ‘रॉयल श्री दिंडोरी’

नाशिकचा दीपक डंबाळे ‘रॉयल श्री दिंडोरी’

Subscribe

नाशिक बॉडीबिल्डींग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने रॉयल फिटनेस क्लब, दिंडोरीने आयोजित केलेल्या पहिल्या ‘रॉयल श्री दिंडोरी’चा किताब नाशिकच्या दीपक डंबाळेने पटकावला. बेस्ट पोझरचा मान नाशिकच्याच नितीन बागूलने आणि मोस्ट इम्प्रुव्हड शरीरसौष्ठवपटूचा मान साकीब शेखने पटकवला.

नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील एकूण ९९ शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सात वजनी गटात झालेल्या या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना खासदार हेमंत गोडसे, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी खासदार हरीश्चंद्र चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हेल्थ अ‍ॅण्ड मोरचे धनंजय काळे, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, विद्यमान नगराध्यक्ष कैलास मवाळ, डॉ. मयुर पाटील, आबासाहेब तांबे, छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, संभाजी ब्रिगेडचे महानगरप्रमुख नितीन शेटे, सोमनाथ जाधव यांच्या हस्ते चषक, रोख रक्कम, प्रमाणपत्र, जीम बॅग आणि शेकर देऊन सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवपटू स्नेहा कोकणे-पाटील, ज्यु. भारती शिवा वगळ व दिव्यांग स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मयूर देवरे यांची या स्पर्धेला विशेष उपस्थिती लाभली.

- Advertisement -

या स्पर्धेसाठी आयोजक रॉयल फिटनेस क्लबचे संचालक हेमचंद्र मोरे, संदीप देशमुख, नगरसेवक तुषार वाघमारे, सोमनाथ जाधव, हिरामण आहेर, शोएब शेख, अक्षय व सागर देशमुख, प्रशिक्षक सुरेश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -