घरक्रीडाIND vs ENG : इंग्लंडची दमदार सलामी; पहिल्या टी-२० सामन्यात ८ विकेट...

IND vs ENG : इंग्लंडची दमदार सलामी; पहिल्या टी-२० सामन्यात ८ विकेट राखून विजयी  

Subscribe

श्रेयस अय्यरने एकाकी झुंज देत ६७ धावांची खेळी केली.

गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यानंतर फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताला २० षटकांत ७ बाद १२४ धावाच करता आल्या. लोकेश राहुल (१), कर्णधार विराट कोहली (०) आणि शिखर धवन (४) हे झटपट माघारी परतले. यानंतर श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरत ४८ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला १२० धावांचा टप्पा पार करता आला. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

रॉयचे अर्धशतक हुकले

१२५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉस बटलर यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. या दोघांनी ८ षटकांत ७२ धावांची सलामी दिल्यावर बटलरला (२८) युजवेंद्र चहलने पायचीत पकडले. तर रॉयचे अर्धशतक एका धावेने हुकले. ३२ चेंडूत ४९ धावा केल्यावर त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. यानंतर मात्र डाविड मलान (नाबाद २४) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद २६) यांनी चांगली फलंदाजी करत इंग्लंडला १६ व्या षटकात विजय मिळवून दिला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -