घरक्रीडाइंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धा

इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धा

Subscribe

बर्नार्डो सिल्वा आणि लिरॉय साने यांच्या गोलमुळे मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडचा २-० असा पराभव केला. या सामन्याला विशेष महत्त्व होते, कारण सिटीला हा सामना जिंकत या मोसमातील ३ सामने शिल्लक असताना प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात लिव्हरपूलला मागे टाकत अव्वल स्थानी जाण्याची संधी होती आणि त्यांनी या संधीचे सोने केलेच. त्यामुळे आता ३५ सामन्यांनंतर सिटी ८९ गुणांसह अव्वल स्थानी असून, लिव्हरपूल ८८ गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे.

या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. युनायटेडच्या मार्कस रॅशफोर्डने काही अंतरावरून फटका मारत गोल करण्याचा प्रयत्न केला, तर सिटीच्या बर्नार्डो सिल्वा आणि रहीम स्टर्लिंगनेही गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आल्याने मध्यंतरापर्यंत ०-० अशी बरोबरी होती. उत्तरार्धाची सुरुवातीलाच सिटीच्या मधल्या फळीतील खेळाडू फर्नांडिनोयोला दुखापत झाल्याने सिटीच्या प्रशिक्षकांनी लिरॉन सानेला मैदानात आणण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

त्यामुळे सिटीने अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. याचा फायदा त्यांना ५४ व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा इकाय गुंडोगनच्या पासवर बर्नार्डो सिल्वाने गोल करत सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सिटीने पुढेही आक्रमक खेळ सुरु ठेवत ६६ व्या मिनिटाला आपली आघाडी दुप्पट केली. त्यांचा हा गोल सानेने केला. यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि हा सामना सिटीने २-० असा जिंकला. हा युनायटेडचा मागील ९ सामन्यांतील सातवा पराभव होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -