घरमुंबईपातळगंगा नदीच्या पाण्याची लूट

पातळगंगा नदीच्या पाण्याची लूट

Subscribe

टँकर लॉबी गबर,कारवाईबाबत प्रशासन उदासीन

तालुक्याला एकीकडे पाणी टंचाईच्या झळा बसत असताना दुसरीकडे मात्र याच पातळगंगा नदीच्या पाण्याची राजरोस लूट करून टँकरद्वारे पाणी विक्री करणारी टोळी गबर झाली आहे. या टोळीवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

खालापूर तालुक्याच्या विकासातील महत्त्वाचा घटक पाताळगंगा नदी असून अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना या नदीवर अवलंबून आहेत. याशिवाय तालुक्यातील अनेक कारखान्यांनी नदीकिनारी पंप हाऊस बांधून पाणी उचलले आहे. अनेक कारखान्यांत मात्र टँकरने पाणी पुरवठा केला जात असून दररोज लाखो लीटर पाण्याचा बेकायदेशीर उपसा टँकर लॉबी करीत आहे. नदी पात्रात थेट फूटवॉल असलेले पाइप टाकण्यात आले आहेत. त्या ठिकाणी विद्युतपंप देखील आहेत. या विद्युत पंपाना वीज पुरवठा अनधिकृतपणे होत आहे. नदी पात्रातून थेट उचलेले पाणी कारखान्यात पुरविले जात आहे. पाणी पिण्यास अयोग्य असून दैनंदिन कामाकरिता वापर करताना पाण्यामुळे अंगावर खाज व पुरळ होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे कारखानदारांच्या डोळ्यातदेखील धूळफेक करून अशुद्ध पाणी माथी मारले जात आहे.

- Advertisement -

पाताळगंगा नदी पात्रातून दिवसाढवळ्या लाखो लीटर पाण्याची टँकरने लूट केली जात आहे. हेच पाणी कारखान्यांना विकून बक्कळ पैसा कमाविणार्‍या टोळीला कोणाचेही भय उरलेले नाही. पाताळगंगा नदीला एकीकडे प्रदूषणाचा पडलेला विळखा वाढत असताना दुसरीकडे नदीच्या पाण्याचा राजरोसपणे पंप लावून उपसा सुरू आहे. दहा ते बारा हजार लीटर पाण्याच्या टँकरसाठी कारखान्यांकडून दोन ते तीन हजार रूपये शुल्क आकारले जात आहे. दिवसभरात शेकडोच्या संख्येने टँकर थेट नदी पात्रातून पाण्याची लूट करीत असताना पाटबंधारे विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.

खालापूर भागातून टँकर माफियांविरोधात तक्रारी पाटबंधारे विभाग कर्जतचे अधिकारी अजय कदम यांचेकडे गेल्यानंतर अशा टँकर माफियाना दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मिळाले होते. परंतु त्यानंतरही शासनाचा महसूल बुडवून राजरोसपणे पाणी चोरी सुरू आहे.

- Advertisement -

पाणी चोरी करून विक्री करणार्‍या टँकर माफियांवर दंडात्मक कारवाई, तसेच रोज किती टँकर पाणी नेले याची नोंद होणार आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र टँकर माफिया रात्रीच्या अंधारात देखील टँकर भरून नेत आहेत. त्याची नोंद मात्र कुठेच होत नाही. याशिवाय पाणी वाहतूक करणारे अनेक टँकर रस्त्यावर चालविण्याच्या स्थितीत नसताना देखील वाहतूक होत आहे. काहींवर नंबर प्लेटचासुध्दा पत्ता नसतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -