Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली ५९ क्रमांकावर; कमाईत ३२ कोटींनी वाढ

सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली ५९ क्रमांकावर; कमाईत ३२ कोटींनी वाढ

Related Story

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा फॉर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत विराट कोहली हा एकमेव क्रिकेटर आहे. या यादीत विराट कोहली ५९ व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी १९७ कोटींच्या कामाईसह ६६ व्या क्रमांकावर होता. यावर्षी त्याच्या कमाईत ३२ कोटींची वाढ होऊन त्याने ५९ व्या क्रमांकावर झेप घेतली.

फॉर्ब्स दरवर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० खेळाडूंची यादी जाहीर करतं. विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे जो सलग पाचव्या वर्षी या यादीत स्थान मिळवलं आहे. मागील वर्षी १९७ कोटींची कमाई करणाऱ्या विराट कोहलीच्या कामाची यावर्षी ३२ कोटींनी वाढ झाली. गेल्या १२ महिन्यात विराट कोहलीने २२९ कोटींची कमाई केली आहे. त्यापैकी सुमारे २५ कोटी रुपये वेतनातून आले आहेत आणि सुमारे २०४ कोटी रुपये जाहिरातींमधून आले आहेत.

- Advertisement -

या यादीत मिक्स्ड मार्शल आर्ट्स (एमएमए) लेजेंड कॉनोर मॅकग्रेगर जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारा खेळाडू आहे. त्याची कमाई सुमारे १५१७ कोटी रुपये एवढी आहे. त्यानंतर २१९ कोटींच्या कमाईसह लिओनेल मेस्सी दुसर्‍या क्रमांकावर असून क्रिस्टियानो रोनाल्डो ८७५ कोटी तिसर्‍या क्रमांकावर आहे.

- Advertisement -