घरक्रीडान्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सची तुफानी खेळी; टी-20 विश्वचषकात शतक ठोकत बनवला नवा विक्रम

न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सची तुफानी खेळी; टी-20 विश्वचषकात शतक ठोकत बनवला नवा विक्रम

Subscribe

टी-20 विश्वचषकातील आजचा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 167 धावा केल्या. फलंदाजीच्या खराब सुरूवातीनंतर ग्लेन फिलिप्सने झुंजार शतकी खेळी केली.

टी-20 विश्वचषकातील आजचा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 167 धावा केल्या. फलंदाजीच्या खराब सुरूवातीनंतर ग्लेन फिलिप्सने झुंजार शतकी खेळी केली. न्यूझीलंडचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना एकट्या ग्लेन फिलिप्सने धडाकेबाज फलंदाजी करत न्यूझीलंडला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. त्याच्या या खेळीमुळे फिलिप्स T20 विश्वचषकात शतक झळकावणारा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज जगातील 10वा फलंदाज ठरला आहे.

या सामन्यात ग्लेन फिलिप्सने 64 चेंडूत 104 धावा केल्या. फिलिप्सचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे शतक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात फिलिप्सने तुफानी फलंदाजी केली. मात्र, सामन्यादरम्यान फिलिप्सचे दोन झेल श्रीलंकेच्या खेळाडूंनी सोडले. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला मोठा फटका सहन करावा लागला.

- Advertisement -

ग्लेन फिलिप्सच्या आधी मॅक्युलमने 2012 साली न्यूझीलंडकडून टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात शतक झळकावले होते. टी-20 विश्वचषकात शतक झळकावणारा ग्लेन फिलिप्स हा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या रिले रोसोने शतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली होती.

फिलिप्स श्रीलंकेविरुद्ध 64 चेंडूत 104 धावा करून बाद झाला, त्याच्या झंझावाती शतकात फिलिप्सने 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले. फिलिप्सला लाहिरू कुमाराने बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

- Advertisement -

या सामन्या प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या 3 विकेट्स अवघ्या 15 धावांवर पडल्या होत्या, परंतु त्यानंतर फिलिप्सने डॅरिल मिशेलच्या साथीने क्रीजवर जोरदार फलंदाजी करत दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. 24 चेंडूत 22 धावा करून डॅरिल मिशेल बाद झाला पण फिलिप्सने येथून वेगवान धावा करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि अखेरीस तो 104 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडने 20 षटकात 7 विकेट गमावत 167 धावा केल्या.


हेही वाचा – Pak vs Zim : ‘वेलकम झिम्बाबर’; ‘झिम्बाब्वे’ शब्द नीट न लिहिल्याने बाबर आझम ट्रोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -