घरक्रीडासुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा होता स्थुलतेमुळे हैराण, लोकं सरपंच म्हणून...

सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा होता स्थुलतेमुळे हैराण, लोकं सरपंच म्हणून चिडवायचे

Subscribe

एकेकाळी नीरजचं वजन तब्बल 80 किलो होतं

 

भारतासाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत नीरजने सुवर्णपदक पटकावले. तब्बल 13 वर्षानंतर ऑलिंम्पिकमध्ये भारतीय तिरंगा उंचावला. नीरजचा जन्म २४ डिसेंबर १९९७ रोजी हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खंड्रा गावात एका छोट्या शेतकऱ्याच्या घरी झाला. नीरजने चंदीगड मधून शिक्षण घेतलं. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. तरी जिद्दीच्या जोरावर त्याने या खेळात सातत्य ठेवलं आणि चांगली कामगिरी करत राहिला. इतकचं नाही तर एकेकाळी नीरजचं वजन तब्बल 80 किलो होतं. त्याला गावातील लोकं सरपंच म्हणून चिडवायचे. यानंतर त्याने आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देत  पानिपतच्या स्टेडीयमला जायला सुरुवात केली. तिथेच नीरज भालाफेक या खेळाशी जोडला गेला आणि पुढे करीयर म्हणून त्याने भालाफेक मध्येच उत्तम कामगिरी करण्याचा निर्णय नीरजने घेतलां. त्याने आपल्या शारिरीक फिटनेस, डाएटवर, वर्कआऊटवर मेहनत घेत शारीराचे वजन कमी केलं. तर कायं होत नीरजचं फिटनेस रुटीन हे आपण जाणून घेणार आहोत.
नीरज चोप्रा एक एथलीट असण्यासोबतच लष्करात काम करत असे. यामुळे तो नेहमीच शिस्तबद्ध जीवन जगत असे. नीरजला जिममध्ये जाऊन वर्कआऊट करणे प्रचंड आवडायचे मात्र कोरोनामुळे जिम बंद असल्याने त्याने घरीच  वर्कआऊट करण्यास सुरूवात केली  नीरज घरातील पायऱ्या आणि रुममध्ये एक्सरसाइज करायचा. नीरज स्ट्रेंन्थ ट्रेनिंग सोबतच आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी दररोज रनिंग करत असे तसेच वेट लिफ्टींग,डंबल फ्रंट अशा प्रकारच्या एक्सरसाइजने स्वत: खांदे मजबूत करण्यात भर देत असे. कराण भाला फेक मध्ये खेळाडूंचे खांदे मजबूत असणे गरजेचं आहे.
नीरज चोप्राचा डाएट प्लान-
नीरज त्याच्या दैनंदिन जीवनात कमी तेलाचे पदार्थ खाण्यास पसंत करतो. तसेच स्पर्धेच्या दिवशी फक्त सॅलेड आणि फळ खात नीरजने त्याची एनर्जी वाढवण्यास मदत होईल अशा आहाराच समावेश केला.सकाळी नाश्त्याच्या वेळी नीरज ब्राऊन ब्रेड आणि ऑमलेटचं सेवन करतो. तसेच दुपारच्या जेवणातनीरज ग्रिल चिकन ब्रेस्ट,ग्रिल सॅलमन आणि अंडी यांचा समावेश करतो. जर मध्ये भूक लागली तर आणि प्रॅक्टीस दरम्यान निरज फक्त ज्यूस पितो.
नीरजचा आवडता आहार
नीरजला पुलाव आणि ऑमलेट खाणे खूप आवडते. तसेच पाणी पूरी खाणे नीरजला प्रचंड आवडते. पाणी पूरीमध्ये पाणी जास्त असल्याने याचा कोणताही वाईट परीणाम एका एथलीटच्या आरोग्यावर होणार नाही असे नीरजचे मत आहे.

 

- Advertisement -

हे हि वाचा –Neeraj Chopra : तू इतिहास लिहिलास…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -