घरक्रीडागोड बातमी! हार्दिक पांड्या बनला बाबा

गोड बातमी! हार्दिक पांड्या बनला बाबा

Subscribe

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाबा झाला आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच या जाोडप्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. याबतची माहिती स्वत:हार्दिक पांड्याने दिली आहे. आम्हाला मुलगा झाला अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

 

- Advertisement -

या वर्षी हार्दिक पांड्या त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का देत आला आहे. २०२० वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यानं बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा केल्याचं जाहीर केलं. हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला. दरम्यान, गेल्या महिन्यात नताशा प्रेग्नंट असल्याचं जाहीर करून लग्नही उरकून घेतलं. बाप होण्याची जबाबदारी खांद्यावर आल्यापासून हार्दिक जबाबदार झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रेग्नंट नताशाला प्रसन्न ठेवण्यासाठी त्यानं फुलांचा गुच्छा भेट दिला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -