घरक्रीडाआयपीएलबाबत निर्णय सरकार घेईल!

आयपीएलबाबत निर्णय सरकार घेईल!

Subscribe

 क्रीडा मंत्री रिजिजूंनी केले स्पष्ट

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) यंदाचा मोसम होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआय नाही तर सरकार घेईल, असे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे. तसेच करोनावर नियंत्रण मिळवल्यानंतरच कोणताही निर्णय घेणे शक्य आहे असेही ते म्हणाले. करोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक पुढे गेल्यास या काळात आयपीएल घेण्याचा बीसीसीआय प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

लोकांच्या जीवाला धोका नसल्यासच आयपीएल होऊ शकेल असे रिजिजू यांना वाटते. भारतामध्ये सर्व निर्णय सरकारनेच घेतले पाहिजेत. यंदा ही स्पर्धा होणार की नाही, हे परिस्थितीवर आणि देश म्हणून आपण कसे पुढे जात आहोत यावर ठरेल. आपण केवळ एका खेळाच्या स्पर्धेसाठी लोकांचा जीव धोक्यात टाकू शकत नाही. आता आम्ही करोनाविरुद्ध लढा देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे रिजिजू म्हणाले. आयपीएलमुळे बीसीसीआयला जवळपास ५३० मिलियन डॉलर्स इतका महसूल मिळतो. त्यामुळे बीसीसीआय ही स्पर्धा व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -