घरमहाराष्ट्रसाधूंसह दोघांची हत्या आरोपीला तेलंगणातून अटक

साधूंसह दोघांची हत्या आरोपीला तेलंगणातून अटक

Subscribe

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात नागठगा येथील बाल तपस्वी निर्वाण रूद्र पशुपतीनाथ महाराज आणि त्यांच्या एका सहकार्‍याची रविवारी पहाटे अडीच वाजता गळा दाबून हत्या करण्यात आली. हत्या करणारा आरोपी साईनाथ लिंगाडे याला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे.

रात्री दीड वाजता बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांसह त्यांच्या दोन सहकार्‍यांची हत्या केल्यानंतर साईनाथ लिंगाडे हा तेलंगणाला पळून गेला होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो तेलंगणाच्या तानूर गावात लपून बसल्याची खबर मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ तानूर गावात जाऊन लिंगाडेला अटक केली असून त्याला धर्माबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. आरोपीविरोधात ३५४चा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मगर यांनी सांगितले. दरम्यान, करोनामुळे सात वर्षांखालील शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात अनेक अडचणी येत आहेत.
या आरोपींची करोना चाचणी करावी लागते. त्यांना क्वॉरंटाइन केल्यानंतर कोर्टात हजर करावे लागत असल्याचे मगर यांचे म्हणणे आहे. तर आरोपीने यापूर्वी गावात एका मुलीची छेड काढली होती. त्यामुळे त्याला अद्दल घडवली असती तर आज साधूची हत्या करण्यापर्यंत त्याची मजल गेली नसती, असं आमदार राजेश पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

रविवारी रात्री नागठणा येथे लिंगाडे याने बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या मठात शिरून त्यांची गळा दाबून हत्या केली. तसेच महाराजांचे सहकारी भगवान शिंदे यांनाही गळा आवळून ठार मारल्यानंतर त्यांचा मृतदेह बाथरूमध्ये टाकला. त्यानंतर लिंगाडेने महाराजांकडील सर्व ऐवज लुटला. यावेळी तो महाराजांच्या गाडीमधून पळून जाण्याच्या तयारीत असताना शेजारी असलेले लोक जागे झाले. त्यामुळे त्याने तेथून पळ काढला. रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचे पार्थिक शरीर उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हत्येची माहिती मिळताच भाविकांनी ग्रामीण रुग्णालय येथे मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -