घरक्रीडाऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान

ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या दुसर्‍या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर 4 गड्यांच्या मोबदल्यात 191 धावांचे आव्हान ठेवले आहे.भारताच्या सलामीची सुरूवात लोकेश राहुल आणि शिखर धवन या जोडीने दमदार केली.राहुलने आक्रमक खेळी करताना 26 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने जलद 47 धावा केल्या.परंतु तो मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच रिचर्डसनच्या गोलंदाजीवर कुल्टर नाईलकरवी झेलबाद झाला.लगेचच शिखर 14 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर भारताची धावसंख्या संथ झाली.

शिखरपाठोपाठ पंत देखील केवळ 1 धाव काढून बाद झाला.त्यावेळी भारताची धावसंख्या 74 धावांवर 3 बाद अशी होती. परंतु त्यानंतर माजी कर्णधार धोनी आणि कर्णधार कोहलीने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत शतकी भागिदारी केली. यात कर्णधार कोहलीने 2 चौकार आणि 6 षटकारांची बरसात करीत नाबाद 72 धावांचे योगदान देत अर्धशतक साजरे केले. तर धोनीने तेवढाच आक्रमक खेळ करीत 23 चेंडूंमध्ये 40 धावा केल्या. धोनी बाद झाल्यावर आलेल्या कार्तिकने 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 8 धावा केल्या.

- Advertisement -

पहिला सामना ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर जिंकला आणि २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे आता दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर ऑस्ट्रेलियातील टी- २० मालिका बरोबरीत सुटल्यामुळे ही मालिका जिंकण्याच्या उद्देशाने पाहुणा संघ मैदानात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -