घरक्रीडाहरभजनच्या टीममधून कोहली, धोनी ड्रॉप

हरभजनच्या टीममधून कोहली, धोनी ड्रॉप

Subscribe

हरभजन सिंगने त्याच्या अलीकडील सर्वोत्तम अकराव्या कसोटीसाठी ११ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

आपल्या गोलंदाजीने खेळाचे मैदान गाजवणारा तसेच भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने सर्वोत्तम ११ कसोटी खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. मात्र हरभजनने सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीला स्थान दिले नाही. कसोटी खेळणार्‍या अष्टपैलु खेळाडूंच्या यादीत महेंद्रसिंह धोनीसुद्धा स्थान मिळवू शकलेला नाही.

एका वृत्त संस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत हरभजन सिंगने अकरा सर्वोत्कृष्ट कसोटीपटूंची नावे जाहीर केली. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंगला हरभजनने या संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. विकेट किपरच्या भूमिकेसाठी श्रीलंकेचा महान कुमार निवडला गेला आहे, तर शॉन पोकॉल, वसीम अक्रम आणि ग्लेन मॅकग्रा यांना संघाचे वेगवान गोलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे. शेन वॉर्न हा एकमेव स्पेशालिस्ट स्पिनर आहे जो हरभजनने त्याच्या ऑल स्टार संघात निवडला आहे. त्यानंतर त्याने जॅक कॅलिसला निवडले हा खेळातील इतिहासातील सर्वांत उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -

हरभजनचे सर्वोत्तम ११ कसोटी खेळाडू

वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, मॅथ्यू हेडन, जॅक कॅलिस, रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा, शॉन पोलॉक, शेन वॉर्न, वसीम अकरम, ग्लेन मॅकग्रा हे हरभजनचे सर्वोत्तम कसोटी खेळणारे ११ खेळाडू आहेत.


हेही वाचा – निवृत्तीनंतरही ‘हा’ खेळाडू करणार कमबॅक !

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -