घरक्रीडाहरभजन सिंगची आयपीएलमधून निवृत्ती? छे, पुढचा सीजनही खेळणार!

हरभजन सिंगची आयपीएलमधून निवृत्ती? छे, पुढचा सीजनही खेळणार!

Subscribe

हरभजन सिंगने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला असून द हण्ड्रेड ड्राफ्ट या टूर्नामेंटमधून माघार घेण्याचा त्याने निर्णय घेतला आहे.

भारताचा एकेकाळचा बॉलिंगमधला हुकमी एक्का असणारा स्पीनर हरभजन सिंग आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, आता खुद्द हरभजन सिंगनेच या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘चेन्नई सुपर किंग्ज फायनलमध्ये पोहोचलेले दोन आयपीएलचे सीजन मी खेळलो आहे. आणि आता मी तशा तिसऱ्या सीजनची वाट पाहात आहे’, असं हरभजन सिंगने सांगितलं आहे. ‘द हण्ड्रेड ड्राफ्ट’ या ब्रिटिश ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धेसाठी हरभजनने त्याचं नाव दिलं होतं. मात्र, बीसीसीआयच्या नियमांनुसार कुठल्याही भारतीय पुरुष खेळाडूला त्याने भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्याशिवाय परदेशात टी-ट्वेंटी खेळता येत नाही. त्यामुळेच हरभजन सिंगच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

- Advertisement -

काय म्हणाला हरभजन सिंग?

‘द हण्ड्रेड ड्राफ्ट’मध्ये आपल्या नावाच्या समावेशाविषयी हरभजन सिंग म्हणाला, ‘बीसीसीआयने आखून दिलेल्या नियमांचा मी आदर करतो. त्यामुळे मी बीसीसीआयचा कोणताही नियम मोडणार नाही. जर त्याचा अर्थ मी हण्ड्रेड ड्राफ्टमधून माझं नाव मागे घेणं असा होत असेल, तर तसंच होईल. मी माझं नाव मागे घेईन. मला कोणते नियम मोडायचे नव्हते. पण मला ड्राफ्टची कल्पना आवडली होती. जेव्हा कधी मला शक्य होईल, तेव्हा मला तिथे खेळायला नक्की आवडेल’, असं हरभजन म्हणाला.

- Advertisement -

याआधी युवराज देखील खेळला परदेशी सीरीजमध्ये

याआधी युवराज सिंग कॅनडाच्या जीटी-२० लीगमध्ये खेळला आहे. मात्र, त्याने जूनमध्ये निवृत्तीची घोषणा केल्यानंतर तो कॅनडामध्ये खेळला होता. सध्या हरभजन सिंग भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या टेस्ट सीरीजमध्ये कॉमेंट्री टीममध्ये असून त्यानंतर येणाऱ्या आयपीएल सीजनसाठी तो चेन्नई सुपर किंग्जकडून महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -