घरक्रीडाहार्दिकला थोडा वेळ द्या - लान्स क्लुसनर 

हार्दिकला थोडा वेळ द्या – लान्स क्लुसनर 

Subscribe

द.आफ्रिकेचा माजी अष्टपैलू लान्स क्लुसनरच्या मते हार्दिक पांड्याला जर चांगला अष्टपैलू बनवायचा असेल तर भारताने त्याला थोडा वेळ देण्याची गरज आहे.

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्याला इंग्लंड दौऱ्यात चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. त्यामुळे काही क्रिकेट समीक्षकांनी त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उभी केली. पण द.आफ्रिकेचा माजी अष्टपैलू लान्स क्लुसनरच्या मते हार्दिक पांड्याला जर चांगला अष्टपैलू बनवायचा असेल तर भारताने त्याला थोडा वेळ देण्याची गरज आहे.

पांड्याला सर्वोत्तम होण्यास अजून वेळ

हार्दिकबाबत क्लुसनर म्हणाला, “सध्याच्या अष्टपैलूंमध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स सर्वोत्तम म्हणता येईल. पण हार्दिक पांड्याही चांगला अष्टपैलू आहे. पण त्याला सर्वोत्तम होण्यासाठी अजून काही काळ लागेल. भारताने त्याला थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे. जर त्याला पुरेसा वेळ दिला तर तो खूप चांगला अष्टपैलू म्हणून पुढे येईल यात शंका नाही.”
सौजन्य – Sportzwiki

कपिल देव बरोबर तुलना थांबवा

हार्दिक पांड्या भारतीय संघात आल्यापासून त्याची कपिल देवसोबत तुलना केली जाते. पण पांड्याला गोलंदाजीला मदत मिळणाऱ्या इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली.  त्यावर क्लुसनर म्हणाला, “कोणत्याही खेळाडूची दुसऱ्या खेळाडूबरोबर तुलना करणे योग्य नाही. अनेक लोक हार्दिकची महान कपिल देव यांच्यासोबत तुलना करतात. पण हे योग्य नाही. हार्दिकला अजून खूप शिकायचे आहे. त्याच्याकडे चांगला अष्टपैलू होण्याची क्षमता आहे. त्याला वेळ देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक संघाला एक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू हवा असतो. तो भारताकडे आहे. त्यामुळे भारताला त्याला वेळ देण्याची आणि हार्दिकला शिकण्याची गरज आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -