घरक्रीडाWorld Cup Final: वर्ल्डकप जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर २४२ धावांचे लक्ष्य

World Cup Final: वर्ल्डकप जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर २४२ धावांचे लक्ष्य

Subscribe

वर्ल्डकपचा थरार आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज लॉर्ड्सवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इंग्लंडने केलेल्या चांगल्या बॉलिंगसमोर त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून २४१ रन्स केले. न्यूझीलंडचा तारणहार कर्णधार केन विल्यमसन आज फारशी कामगिरी करु शकला नाही. त्याने केवळ ३० रन्स केले. तर सलामीवीर निकोल्सने ५५ तर टॉम लॅथमने झटपट ४७ रन्स केले. इंग्लंडकडून वेगवान बॉलर वोक्स आणि प्लंकेट यांनी तीन – तीन विकेट्स घेतल्या.

सेमी फायनलमध्ये डायरेक्ट स्टम्प हीट करुन धोनीला रन आऊट करणारा न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल फायनल मॅचमध्ये देखील चमक दाखवू शकला नाही. १८ बॉलमध्ये १९ रन्स करुन तो आऊट झाला. त्याचप्रमाणे निवृत्तीच्या मार्गावर असलेला रॉस टॉलरही खास कामगिरी करु शकला नाही. इंग्लंडकडून सर्व बॉलर्सनी चांगली गोलंदाजी केली असली तरी जोफ्रा आर्चरला एका विकेटवर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

इंग्लंड संघ १९९२ नंतर पहिल्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. तर न्यूझीलंड २०१५ नंतर लागोपाठ दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. मात्र आतापर्यंत दोन्ही संघाना एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -